August 15, 2025 7:30 am

अमिताभ बच्चन हे सर्वाधिक 120 कोटी रुपये कर भरणारे भारतीय सेलिब्रिटी

♦ 82व्या वर्षी अमिताभ यांनी शाहरुखला टाकले मागे:

120 कोटी रुपये कर भरला, सर्वाधिक कर भरणारे भारतीय सेलिब्रिटी बनले

मुंबई : २०२४-२५ या वर्षात अमिताभ बच्चन हे सर्वाधिक कर भरणारे भारतीय सेलिब्रिटी बनले आहेत. २०२४-२५ या आर्थिक वर्षात या अभिनेत्याने १२० कोटी रुपयांचा कर भरला आहे. कर भरण्याच्या बाबतीत बिग बी यांनी अभिनेता शाहरुख खानला मागे टाकले आहे.

३५० कोटींच्या उत्पन्नावर १२० कोटी कर

                  या वर्षी अमिताभ बच्चन यांची एकूण कमाई ३५० कोटी रुपये झाली आहे. त्यांनी हे पैसे ब्रँड एंडोर्समेंट, चित्रपट आणि कौन बनेगा करोडपती शो होस्टिंगद्वारे कमावले आहेत. गेल्या दोन दशकांपासून ते या शोचे होस्ट आहेत. पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, गेल्या वर्षी अभिनेत्याने ७१ कोटी रुपये कर भरला होता. या वर्षासाठी अभिनेत्याने १५ मार्च २०२५ रोजी ५२.५ कोटी रुपयांचा कराचा शेवटचा हप्ता भरला आहे.

गेल्या वर्षी शाहरुख हाईएस्ट टॅक्स पेयर

                 या वर्षी शाहरुख खानने ८४.१७ कोटी रुपयांचा आगाऊ कर भरला आहे. तर, सलमान खानने ७५ कोटी रुपये आणि दक्षिणेतील अभिनेता थलापती विजयने ८० कोटी रुपये कर भरला आहे. गेल्या आर्थिक वर्षात शाहरुख खानने ९२ कोटी रुपये कर भरला होता. असे करून तो हाईएस्ट टॅक्स पेयर सेलिब्रिटी बनला.

अमिताभ यांचे मुंबईत ५ आलिशान बंगले

                अमिताभ बच्चन यांचे मुंबईत पाच बंगले आहेत. त्यांच्या ४ बंगल्यांची नावे जलसा, जनक, प्रतीक्षा, वत्स अशी आहेत. अमिताभ आपल्या कुटुंबासह मुंबईतील जुहू परिसरातील जलसा बंगल्यात राहतात. या बंगल्याची किंमत सुमारे १२० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. ‘सत्ते पे सत्ता’ चित्रपटाच्या यशाचे मोबदला म्हणून दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी बिग बींना हा बंगला भेट म्हणून दिला होता.

                त्यांचा दुसरा बंगला ‘प्रतीक्षा’ ची किंमत १६० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते, जिथे ते त्यांच्या वडिलांसोबत राहत होते. पण गेल्या वर्षी त्यांनी त्यांचा जुहू बंगला ‘प्रतिक्षा’ त्यांची मुलगी श्वेता नंदा हिच्याकडे हस्तांतरित केला. बिग बी यांचे कार्यालय त्यांच्या ‘जनक’ बंगल्यात आहे. याशिवाय त्यांचे वडिलोपार्जित घर उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे देखील आहे. अमिताभ यांनी या जागेचे शैक्षणिक ट्रस्टमध्ये रूपांतर केले आहे. त्यांच्याकडे देशभरात इतरही अनेक मालमत्ता आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन यांची फ्रान्समध्येही एक मालमत्ता आहे.

अमिताभ बच्चन: कौन बनेगा करोडपती, ब्रँड एंडोर्समेंटमधून सुमारे ₹८ कोटी कमावता

                 २०२४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती १,६०० कोटी रुपये असल्याचे दिसून आले आहे. अमिताभ बच्चन यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत चित्रपट, टीव्ही शो – कौन बनेगा करोडपती आणि ब्रँड एंडोर्समेंट (अंदाजे ५-८ कोटी रुपये) आहे. याशिवाय, शेअर बाजार किंवा मालमत्तेतील गुंतवणूक हे देखील त्यांच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत आहेत. ८० च्या दशकातील धर्मेंद्र, जितेंद्र इत्यादी बहुतेक स्टार्सनी त्यांची चमक गमावली, पण अमिताभ यांची चमक अजूनही अबाधित आहे.

अमिताभ यांच्याकडे आलिशान गाड्यांचे मोठे कलेक्शन

                                                                       बिग बींकडे लक्झरी ब्रँडच्या एकूण ११ गाड्या आहेत. ज्यामध्ये लेक्सस, रोल्स रॉयल फॅंटम, २ बीएमडब्ल्यू, ३ मर्सिडीजचा समावेश आहे. बिग बी नंबर २ ला भाग्यवान मानतात. ही त्यांच्या जन्मतारखेची बेरीज देखील आहे. त्यांच्या सर्व गाड्यांचा नंबर देखील नेहमीच २ हाच असतो. ‘एकलव्य’ चित्रपटातील त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी निर्माते विधू विनोद चोप्रा यांनी त्यांना पांढऱ्या रंगाची रोल्स रॉयल फॅंटम कार भेट दिली होती. ही त्यांच्या कार कलेक्शनमधील सर्वात महागडी कार आहे, ज्याची किंमत सुमारे ९ ते ११ कोटी रुपये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News