अयोध्या: राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहारावरून शिवसेना (उबाठा) आक्रमक

का टा वृत्तसेवा I संजय श्रीखंडे

१८ जुलैच्या ‘रामरक्षा महाआरती’साठी संजय राऊतांचे आवाहन

कळमेश्वर विश्रामगृहातील बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

“रामाच्या नावावर झालेल्या कथित गैरव्यवहाराविरोधात जनआंदोलन उभारा”

कळमेश्वर : अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली भूमिका अधिक आक्रमक केली असून, राज्यसभा खासदार तथा पक्षाचे प्रमुख नेते संजय राऊत यांनी बुधवारी (१६ जुलै) कळमेश्वर येथील विश्रामगृहात शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना राऊत यांनी राम मंदिर उभारणीशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहाराचा उल्लेख करत, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. भगवान श्रीराम हे संपूर्ण देशाच्या श्रद्धेचे केंद्र असून, त्यांच्या नावावर कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. या विषयावर देशभरात संतापाची भावना निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी १८ जुलै रोजी नागपूरच्या रामनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘रामरक्षा महाआरती’ व सामूहिक पठण कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहभागी होणार असल्याची माहिती देत, नागपूर जिल्ह्यासह परिसरातील शिवसैनिक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले.

कळमेश्वर येथील विश्रामगृहात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खासदार संजय राऊत.
कळमेश्वर येथील विश्रामगृहात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खासदार संजय राऊत.

बैठकीस जिल्हाप्रमुख उत्तम कापसे, सुधीर सुरवंशी, विनोद जिवतोडे, बाळू जाचक, विलास बारमासे, मधुकरराव दळवी, माणिकराव चांदुरकर, राजेश बोरकर, निखिल चांदुरकर, धीरज ढवळे, विजय वाघमारे, हरीश हिगनेकर, मोरेश्वर रक्षक, बाबाराव गोतमारे, मोरेश्वर डेहनकर, निखिल कटायरमल, संजय भोगे, राहुल हिवराळे, केशवराव गणोरकर, वृषभ राऊत, गुडू इम्रान पठाण, किशोर तुरकर, विजय खेडकर, अरुण रत्नपारखी, अनिल बोडखे, अरुण सहारे, रमेश मोहरे, विजय अतकरी, विजय वानखडे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

शिवसेनेच्या आगामी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीत संघटनात्मक तयारी, जनजागृती आणि रामनगर येथे होणाऱ्या ‘रामरक्षा महाआरती’ कार्यक्रमाच्या नियोजनावरही चर्चा करण्यात आली.

0
0

Leave a Reply

Realted News