♦ एकल विधवा महिला ‘कल्पना काळबांडे’ यांच्या हस्ते पो. स्टे. च्या परिसरात ‘वट’ वृक्षारोपण
का टा वृत्तसेवा I संजय श्रीखंडे
कळमेश्वर : कळमेश्वर पोलिस स्टेशन अंतर्गत ‘भरोसा सेल’च्या वतीने वटपौर्णिमेनिमित्त एकल विधवा महिला कल्पना काळबांडे यांच्या हस्ते, पोलिस स्टेशनच्या आवारात वटवृक्षाचे रोपण करण्यात आले. कळमेश्वर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मनोज काळबांडे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली समाजाच्या कालबाह्य रूढी-परंपरांना झुगारून समाजिक मानसिकता बदलण्याचा कार्यक्रम यशस्वी झाला. याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
महिलांच्या उत्थानासाठी कितीही कायदे केले, तरी समाज सुधारल्या शिवाय कायद्याची अंमलबजावणी शक्य होणार नाही. ही मानसिकता बदलावी व समाजाने सांस्कृतिक कार्यामध्ये व सणांमध्ये एकल महिलांना स्थान मिळवून देऊन भेदभावाच्या दरीतून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या हातून वृक्षारोपण करून संदेश देण्यात आला. कळमेश्वर पो. स्टे. चे पो. नि. मनोज काळबांडे हे अंधश्रद्धा निर्मुलनासाठी सातत्याने प्रयत्नरत असतात. परिणामी अंधश्रद्धा-जादूटोणा सारख्या गैरप्रकारातून उद्भवणाऱ्या घटनांवर/ गुन्ह्यांवर आळा बसला आहे.
यावेळी कार्यक्रमाच्या संयोजिका कळमेश्वर पोलिस स्टेशन ‘भरोसा सेल’च्या प्रमुख गीता दळवी, कल्पना काळबांडे, छाया शेवाळे, ॲड. श्रद्धा कळंबे, मेघा भिंगारे, महिला पोलिस निलाक्षा नेहारे, संगीता डाखोळे, पंचफुला मोरे, गार्गी चरडे आदींसह अनेक पोलीस कर्मचारी उपस्थित होते.













Users Today : 2
Users Yesterday : 11