कारंजाच्या मॉडेल हायस्कूलचे शिक्षक विनोद चाफले ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित

विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांसह शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल; शिक्षक दिनी सपत्नीक गौरव

का टा वृत्तसेवा I कारंजा (घाडगे) : स्थानिक मॉडेल हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक विनोद दिवाकर चाफले यांना शैक्षणिक क्षेत्रातील दीर्घ कार्य, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार-२०२६’ देऊन सन्मानित करण्यात आले.

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, गोविंदराव वंजारी फाउंडेशन, नागपूर आणि गोविंद मैना फाउंडेशन, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात शिक्षक दिनानिमित्त ‘सन्मान कर्तृत्वाचा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या सोहळ्यात विधान परिषदेचे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, आमदार अभिजित वंजारी आणि विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष अरविंद देशमुख यांच्या हस्ते विनोद चाफले यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. यावेळी माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे आणि ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न

विनोद चाफले यांनी शैक्षणिक क्षेत्रात प्रदीर्घ काळ कार्य करताना विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले असून, गरजू विद्यार्थ्यांना शासनाच्या ‘बालसंगोपन’ योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

शिक्षणासोबतच सामाजिक क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला असून, विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून त्यांनी समाजोपयोगी कार्य केले आहे. त्यांच्या याच शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

विनोद चाफले यांच्या या उल्लेखनीय सन्मानाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, सचिव, शाळेचे मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या यशामुळे मॉडेल हायस्कूलच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचीही प्रशंसा होत असून, सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.

📲 कामगार टाइम्स
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क  I परमानंद मुदगल : 📲 9028162217

📲 कामगार टाइम्स | बातमी आपल्या मोबाईलवर, थेट आपल्या गावातून

0
0

Leave a Reply

Realted News