गेटला धडकून कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू

कोराडी औष्णिक विद्युत केंद्राच्या गेटला धडकून कर्मचाऱ्याचा मृत्यू

का टा वृत्तसेवा : सतीश तांडेकर
कोराडी : खापरखेडा औष्णिक विधुत केंद्र येथे महाजेनको मधे कार्यरत कर्मचारी तुषार माधव भुजाडे वय 42 यांचा कोराडी विद्युत केंद्राच्या गेटला धडकून जागीच मृत्यू झाला. औष्णिक विद्युत केंद्र कोराडी येथून बदली होऊन खापरखेडा औष्णिक विधुत केंद्र (महाजेनको) येथे रुजू झाले होते.
ही घटना दि. 4 जून 2025 ला दुपारी 3 वाजता दरम्यान घडली. ते 3X660 मे. व्हॅ. औष्णिक विद्युत केंद्र कोराडी येथे काही कामा निमित्य आले असता, काम आटोपून औष्णिक विद्युत केंद्र कोराडी येथून बाहेर जाताना गाडी निष्काळजी पणे चालवून गेट ला धडक देऊन जागीच कोसळून गंभिर जखमी झाले. लगेच त्यांना कोराडी वसाहत येथील महाजनको च्या हाॅस्पिटलमध्ये नेले असता उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास कोराडी पोलीस करीत आहे.

 

1
0

Leave a Reply

Realted News