‘महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय, स्थानांतरण सोहळा व कायदे विषयक मार्गदर्शन’
‘वाचन संस्कृतीला नवा वेग देण्याचा संकल्प’
का टा वृत्तसेवा I भूषण सवाईकर
मोहपा : कळमेश्वर तालुका विधी सेवा समिती व महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय, मोहपा यांच्या संयुक्त विद्यमाने मोहपा येथे कायदेविषयक मागदर्शन व डाॅ. प्रशांत महाजन यांचे पुस्तक प्रकाशनाचा सोहळा थाटात सम्पन्न झाला. तत्पुर्वी ‘ महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाचे, मोहपा नगरपरिषदेच्या इमारतीत स्थानांतरण करण्यात आल्याचा सोहळा पार पडला. या भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन दि.19 सप्टें. ला सायंकाळी करण्यात आले.

कळमेश्वर तालुका विधी समितीचे अध्यक्ष तथा मुख्य न्यायाधीश रवींद्र राठोड हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाला न्या. सौरभ मांडवे, सहन्यायाधीश कळमेश्वर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी मिनाक्षी कांबळे, पोलिस निरीक्षक मनोज काळबांडे, तालुका वकिल संघाचे अध्यक्ष ॲड. हेमंत ताजने, तालुका वकिल संघाचे सचिव ॲड. निलेश अंजनकर तसेच सरकारी अभियोक्ता ॲड. आकाश काळे प्रामुख्याने उपस्थित होते.
ॲड. निलेश अंजनकर यांनी महीलांसाठी कायदे व कौटुंबिक हिंसाचार यावर सविस्तर मार्गदर्शन केले. सहन्यायाधीश सौरभ मांडवे व जिल्हा ग्रंथालय अधिकारी मिनाक्षी कांबळे यांनी सुघ्द्धा उपस्थितांना मार्गदर्शन केले.

‘ग्रंथालय हे ज्ञानाचं भांडार’ : न्यायाधीश रवींद्र राठोड
‘ ग्रंथालय म्हणजे केवळ पुस्तकांचं ठिकाण नाही, तर ते ज्ञानाचं भांडार आहे. आधुनिक युगात डिजिटल माध्यमांचा प्रभाव वाढला असला, तरी पुस्तकांचं महत्त्व कधीही कमी होणार नाही. वाचन संस्कृती टिकवली नाही, तर समाजाचं बौद्धिक स्वास्थ्य धोक्यात येईल. यामुळे वाचन संस्कृती टिकली पाहिजे, असे मत न्यायाधीश रवींद्र राठोड यांनी व्यक्त केले. न्या. राठोड, मोहपा येथे आयोजित महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय स्थानांतरण सोहळा तसेच तालुका विधी सेवा समिती तर्फे आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
डाॅ. प्रशांत रमेशराव महाजन यांच्या
‘उत्तम बंडू तुपे – व्यक्ती आणि वाड्ःमय’
या पुस्तकाचे प्रकाशन सम्पन्न
कार्यक्रमाचे सुरूवातीलाच स्थानिक ‘महात्मा फुले स्टडी सर्कल’ चे अध्यक्ष व महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाचे संचालक डाॅ. प्रशांत रमेश महाजन हयांच्या ‘उत्तम बंडू तुपे – व्यक्ती आणि वाङ्मय’ या पुस्तकाचे प्रकाशन कळमेश्वर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रविंद्र राठोड यांचे हस्ते करण्यात आले.

सामाजिक बांधिलकीची जाणिव ठेवून महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाला मदत व सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे ॲड. सागर कौटकर, गजानन मंदिर समितीचे माजी अध्यक्ष दिलीप नेरकर, मधुगंगा नागरी पतसंस्थेचे संचालक नंदकिशोर आखरे, माजी बांधकाम सभापती विजय वानखेडे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी वाचन संस्कृतीला नवा वेग देण्याचा संकल्प केला गेला. महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष त्र्यंबक राउत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर आभार प्रदर्शन ॲड. हर्षल यावलकर यांनी केले. सुत्रसंचालन डाॅ. प्रशांत महाजन यांनी केले. प्रदीप विघ्ने, सेवाराम नेरकर, श्रीराम रंगारी, मंदार कौटकर, राहुल श्रीखंडे, अजय चिमोटे, उमेश लंगडे, विनेश वंजारी, कपिल गणोरकर, ग्रंथपाल जयंत अंजनकर, मनीष अंजनकर, नीलेश नेरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाला ॲड. विनोद कौटकर, ॲड. लंकेश गजभिये, खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष आशिष देशमुख, विधी सेवा समितीचे सदस्य अण्णाजी चव्हाण, ‘कामगार टाइम्स’ चे संपादक महेंद्र शेंडे, विजय नागपुरे इ. सह मोठया संख्येने महिला व विद्यार्थी उपस्थित होते. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

















Users Today : 3
Users Yesterday : 11