SSC RESULT : दहावी बोर्डाचा निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर

दहावी बोर्डाचा निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर

राज्यातील १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार;

विविध संकेतस्थळांवर ऑनलाइन निकाल उपलब्ध

नागपूर : Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education तर्फे फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल आज, शुक्रवार ८ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. राज्य मंडळाचे सचिव डाॅ. दिपक माळी यांनी परिपत्रकाद्वारे याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.

यंदा राज्यभरातून तब्बल १६ लाख १५ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली असून, त्यांच्या निकालाकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.

विद्यार्थ्यांना पुढील संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार आहे :

दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गेल्या काही वर्षांपासून दहावी आणि बारावीचे निकाल विक्रमी वेळेत जाहीर करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. पूर्वी जून महिन्यापर्यंत लांबणारे निकाल आता मे महिन्यातच जाहीर होत असल्याने विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेश प्रक्रियेला वेग मिळत आहे.

बारावीचा निकाल २ मे रोजी जाहीर झाल्यानंतर आता दहावीचा निकालही वेळेत जाहीर होत असल्याने अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी मार्ग मोकळा होणार असून, नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवातही नियोजित वेळेत होण्यास मदत होणार आहे.



0
0

Leave a Reply

Realted News