भारत-पाकिस्तान मॅचवरुन सुषमा अंधारेंचा गृहमंत्री शहांवर हल्लाबोल
मुंबई : आशिया कप क्रिकेट सामन्याच्या निमित्ताने भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यांवरून सध्या राजकीय वर्तुळात जोरदार टीका-टिप्पणी सुरू आहे. याच वादात आता उबाठाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उडी घेतली आहे. बहिणीच्या कुंकापेक्षा लाडक्या लेकाचे करिअर जास्त महत्त्वाचे आहे, हे कधी कळणार? असा खोचक सवाल करत त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.
सुषमा अंधारे म्हणाले की, भाजप नेते देशासाठी लढणाऱ्या महिलांना भाऊबीज-रक्षाबंधनची आठवण करून देतात, पण याचवेळी त्यांच्यासाठी व्यापाराचे हित अधिक महत्त्वाचे असते, असा टोला त्यांनी लगावला

लाडकी बहीण. . बहिणीचे कुंकू वगैरे सगळं तात्पुरतं असतं रे. . शाश्वत असतो तो व्यापार : सुषमा अंधारे
सुषमा अंधारे म्हणाल्या की, देश देश करणाऱ्या वेड्यांनो, लाडक्या बहिणीच्या कूंका पेक्षा लाडक्या लेकाचे करिअर जास्त महत्त्वाचं आहे. हे कधी कळणार रे… अरे व्यापार महत्त्वाचा आहे… लाडकी बहीण… बहिणीचे कुंकू वगैरे सगळं तात्पुरतं असतं रे… शाश्वत असतो तो व्यापार… फक्त व्यापार… असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. आज आशिया कप क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक मोठा सामना होणार आहे. दोन्ही संघांनी त्यांचे पहिले सामने जिंकले आहेत. हा सामना जिंकणारा संघ सुपर-4 साठी पात्र ठरेल हे जवळजवळ निश्चित आहे.
भारत-पाक मॅचमागील ‘पैशाचा खेळ’; जय शहा आयोजक
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना त्यांच्या मुलाला देशभक्ती शिकवता आली नाही त्यांनी आम्हाला देशभक्ती शिकवू नये. तुमचा मुलगा दुबईत बसून भारत-पाकिस्तान मॅचचे आयोजन करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना पदावरून जावे लागेल त्यांनी आम्हाला देशभक्ती शिकवू नये असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊत यांनी कितीचा जुगार भारत-पाकिस्तान मॅचवर लावला : नवनाथ बन
नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांनी कितीचा जुगार भारत-पाकिस्तान मॅचवर लावला आहे. माझी माहिती आहे की,भांडुपमधून त्यांनी सर्वाधिक सट्टा लावला आहे. सट्टाबाजार काय असतो हे तुम्हालाच चांगले माहिती आहे. अलिबागच्या घरात ते लपून सामना पाहणार आहेत, याची माहिती आम्हाला आहे. स्वतः जुगार खेळतात आणि इतरांना शिकवतात. पाकिस्तान सामन्यावर कोटींचा जुगार लावणाऱ्या राऊतांनी देशभक्ती वर भाषण करणं म्हणजे ढोंग आहे.













Users Today : 1
Users Yesterday : 11