माफीनामा फेटाळला, पण अटक स्थगित;
शाह नी कर्नल सोफियांवर टिप्पणी केली होती
नवी दिल्ली/भोपाळ : कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणारे मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांची माफी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तथापि, न्यायालयाने त्यांच्या अटकेलाही स्थगिती दिली आहे.
शाह यांच्या वकिलाने सांगितले की त्यांच्या अशिलाने माफी मागितली आहे. याबद्दल न्यायालयाने त्यांना फटकारले. न्यायालयाने म्हटले की, तुम्ही लोकांसमोर पूर्णपणे उघडे पडला आहात. तुम्ही एक सार्वजनिक व्यक्ती आहात. बोलताना तुम्ही तुमच्या शब्दांचा विचार केला पाहिजे.