♦ राजेंद्र फुलबांधे महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे नागपूर जिल्हाध्यक्ष
♦ नागपूर शाखेचे समाज बांधवांसाठी विविध उपक्रम राबविण्यात सातत्य : प्रा. अशोक सालोडकर
भूषण सवाईकर
नागपूर : महाराष्ट्र नाभिक महामंडळ नागपूर जिल्हयाची पंचवार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार २४ एप्रिल २०२५ ला संत नगाजी महाराज मठ, महाल, नागपूर येथे संपन्न झाली. महामंडळाचे माजी प्रदेश कार्याध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक बंडुभाऊ राऊत, प्रदेश कार्याध्यक्ष शाम आस्करकर, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. महामंडळाचे नागपूर जिल्हाध्यक्ष गणपतराव चौधरी सभेच्या अध्यक्षस्थानी होते.
सभेचे प्रास्ताविक नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र फुलबांधे यांनी केले तर जिल्हा सरचिटणीस वैभव तुरक यांनी वर्ष २०२४-२५ चा जमा खर्च सभेपुढे मांडला, त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. तदनंतर मावळत्या अध्यक्षांचा ५ वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे नवीन अध्यक्षांची नियुक्ती करण्याकरिता निरीक्षक म्हणून प्रा. अशोक सालोडकर अध्यक्ष, पूर्व विदर्भ यांनी नागपूर जिल्हा अध्यक्षपदी श्री राजेंद्र फुलबांधे यांची सर्वानुमते निवड झाल्याची घोषणा केली.
तसेच मावळते अध्यक्ष गणपतराव चौधरी यांना बढती देऊन पूर्व विदर्भ कार्याध्यक्षपदी तर कार्याध्यक्ष विष्णु इझनकर यांची पूर्व विदर्भ उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. पूर्व विदर्भ महिला अध्यक्ष पदी मालती अमृतकर यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे. महामंडळाचे पूर्व विदर्भ सरचिटणिस जगदिश सुर्यवंशी, उपाध्यक्ष मोहन निंबाळकर, संघटक घनश्याम सूर्यवंशी यांनी उमेदवारांच्या मुलाखती घेवून महामंडळाच्या निवडणूक कार्यक्रमात आपला सहभाग नोंदविला.
सभेचे संचालन महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे सतीश सुरसे तसेच आभार प्रदर्शन रविंद्र नक्षिने यांनी केले. सभेला सुरेश अतकरे, नागपूर जिल्हा महिला अध्यक्ष अर्चना कडू, भंडारा जिल्हा अध्यक्ष प्रमोद मेश्राम, अशोक सूर्यवंशी अध्यक्ष, मध्य नागपुर, योगेश नागपूरकर, संघटक नागपूर जिल्हा, सचिव विनेश कावळे, कार्यालयीन सचिव विजय वालुकर, नागपूर जिल्हाचे पदाधिकारी तथा समाज बंधू- भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.