महाराष्ट्र नाभिक महामंडळाची नागपूर जिल्हा नविन कार्यकारीणी कार्यान्वित
नागपूर: महाराष्ट्र नाभिक महामंडळ, नागपूर जिल्हा कार्यकारणीचा विस्तार सोहळा आज सोमवारला संत नगाजी महाराज सांस्कृतिक सभागृह (मठ) येथे संपन्न झाला. जिल्हाध्यक्ष राजेंद्र फुलबांधे यांच्या उपस्थितीत तसेच प्रदेश कार्याध्यक्ष श्यामभाऊ आस्करकर, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र इंगळे, महिला विदर्भ अध्यक्षा मालतीताई अमृतकर, विदर्भ महिला कार्याध्यक्ष चेतनाताई मिरासे, माजी महिला जिल्हा अध्यक्ष अर्चनाताई कडु यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. नवनियुक्त पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र तसेच पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मोठया संख्येने समाज बांधव-भागिनी उपस्थितीत होते.
नागपूर जिल्हा कार्यकारीणीत अध्यक्ष: राजेंद्र फुलबांधे, कार्याध्यक्ष: राजु चिचाळकर, वैभव तुरक, सरचिटणीस: विनेश कावळे, उपाध्यक्ष: कैलास अतकरे, महादेव जिचकार, विनोद जमदाडे, डाॅ. नितिन कान्होलकर, प्रफुल अनकर, प्रदिप शेंडे, राजेश डेहनकर, सचिव : विजय वालूकर, सहसचिव: योगेश नागपूरकर, संघटन सचिव: रविंद्र नक्षने, कोषाध्यक्ष: अशोक सुर्यवंशी, संपर्क प्रमुख: सतिश सुरुसे, प्रसिध्दी प्रमुख: नितेश चौधरी, संघटक: दिनेश सर्यवंशी, नितीन पांडे, विवेक तळखंडे, चक्रधर कुंडले, योगेश कापसे, सह संघटक: प्रविण निंबाळकर, स्वप्निल तळखंडे, योगेश खंडे, मनोज कडवे यांचा समावेश आहे. प्रकल्प व्यवस्थापक – डाॅ योगेश्वर राऊत, युवा आघाडी अध्यक्ष तुषार मिराशे, आय टी प्रमुख: पवन धानोरकर, नागपूर जिल्हा महिला कार्यकारिणी अध्यक्ष: मंजुषा पानबुडे, कार्याध्यक्ष: रूपाली राउत, स्मिता नक्षने सचिव-ः भारती वाटकर, सहसचिव-ः नुपुर कडवे, उपाध्यक्ष: वनिता जाधव, पुजा अतकरे, विदया नागतुरे, संघटक: सुषमा वाटकर, कांचन हुडके, करूना इलोरकर, सहसंघटक : राजश्री इंगळे कार्यभार सांभाळतील. विभागीय अध्यक्ष : पश्चिम नागपूर अजय अतकरे, अध्यक्षा : मध्य नागपूर भावना मिरासे, अध्यक्षा: दक्षिण नागपूर भावना इलोरकर कार्यभार सांभाळतील.