“महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी” : बॅरि. शेषराव वानखेडे महाविद्यालयात व्याख्यानमालेचे आयोजन
मोहपा : स्थानिक बॅरि. शेषराव वानखेडे महाविद्यालय, मोहपा येथे “महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी” या अत्यंत महत्वाच्या विषयावर एकदिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील रोजगाराच्या संधींविषयी माहिती देणे आणि त्यांना योग्य दिशादर्शन करणे हा होता.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अलका थोडगे यांच्या प्रस्तावनेने झाली. त्यांनी आपल्या भाषणात रोजगाराच्या बदलत्या प्रवाहांविषयी, कौशल्य विकासाचे महत्व आणि विद्यार्थ्यांनी करिअरसाठी कोणती दिशा निवडावी यावर प्रकाश टाकला. या व्याख्यानमालेत अमृत मराठे आणि त्यांच्या पत्नी किर्ती मराठे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अमृत मराठे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात खासगी आणि सरकारी क्षेत्रातील उपलब्ध संधी, स्टार्टअप्स, डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरील कामाच्या संधी तसेच उद्योग-व्यवसायातील नवीन ट्रेंड्स यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी त्यांना विविध प्रश्न विचारून संवाद साधला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डॉ. विनोद भालेराव यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. डॉ. लिलाधर खरपूरिये यांनी आभारप्रदर्शन करत उपस्थित मान्यवरांचे आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला असून, भविष्यात अशा अनेक मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन करण्याचा मानस महाविद्यालयाने व्यक्त केला आहे. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. डॉ. संजय ठवळे, प्रा. डॉ. प्रमोद वडते, डॉ. धनंजय देवते, प्रा. सचिन काळे, प्रा. अनिता गणोरकर, प्रा. शैलेश हातबुडे, प्रा. पवन उमक, प्रा. सिद्धार्थ चनकापुरे, संजय गणोरकर, हरीश अंजनकर , रजनी गणोरकर, कल्पना देवळे, अरविंद दहाट, प्रदीप बगडे, प्रकाश काकोटे आणि विद्यार्थी मित्रांचे मोलाचे सहकार्य लाभले.














Users Today : 3
Users Yesterday : 11