सरकार शेतकऱ्यांना मदत करण्याच्या भूमिकेत- मंत्री बावनकुळे
50 लाख हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण
2 तासांपूर्वी :>
नागपूर : राज्यातील कोणताही शेतकरी हा पंचनाम्यापासून सुटू नये, यासाठी आम्ही जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांच्यासोबत बैठक घेतली आहे. नैसर्गिक आणि अनैसर्गिक परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, पण कुठल्याही शेतकऱ्यांच्या जमिनीचे पंचनामे सुटू नाही याची काळजी महाराष्ट्र सरकार घेत आहे, असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, नेत्यांच्या दौऱ्यामध्ये अनेक अधिकारी त्यांच्यासोबत असतात, अधिकारी आणि कर्मचारी जर फील्डवर राहिले तर शेतकऱ्यांना खरी मदत होईल. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरच्या कळमेश्वर मध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात आली. कमळेश्वर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात संत्रा बागांचे नुकसान झाले आहे. याची पाहणी बावनकुळे यांनी केली आहे.

राज्यभरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, नागपूर जिल्ह्यामध्ये परवा प्रचंड गारपीट आणि पाऊस झाला आहे. यामध्ये 60 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सोयाबीन, कपास, संत्री संपूर्ण पणे उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवलं आहे. शेतकऱ्यांना सरकारकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. पण शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे, त्यांची संपूर्ण फळबाग उद्ध्वस्त झाली आहे. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये झाडेच राहिलेली नाही शेतात काहीच शिल्लक नाही. राज्यभरात हीच परिस्थिती दिसून येत आहे. मी परवा अमरावती मध्ये गेलो तेव्हा हीच परिस्थिती दिसून आल्याने आपण तिथे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज्यातील शेतकरी हा संकटामध्ये आहे. राज्यातील संपूर्ण पंचनाम्यावर मी लक्ष ठेवून होतो. ऑगस्टचा विचार केला तर आम्हाला 25 लक्ष हेक्टरचे पंचनामे आम्हाला प्राप्त झाले आहे. तर सप्टेंबरमध्ये 22 लाख हेक्टरचे पंचनामे आम्हाला मिळाले आहेत. जवळपास 50 लाख हेक्टरचे पंचनामे आमच्याकडे आले असून ऑक्टोबरच्या 4 ते 5 तारखेपर्यंत संपूर्ण परिस्थिती लक्षात येईल.
राज्यातील शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले आणि किती जनावरे वाहून गेले ही संपूर्ण माहिती आपल्याकडे येत्या 4 ते 5 दिवसात येईल. मानवी मृत्यूचा आकडा आपल्यासमोर आला आहे. काही घरांची पडझड झाली आहे. शेतकऱ्यांचे पंचनामे करत असताना सर्व काही वेगवेगळे असतात. नियमांवर बोट न ठेवता सरसकट पंचनामे करण्यात येणार आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे.












Users Today : 1
Users Yesterday : 11