महाराष्ट्र नाभिक महामंडळ रामटेक तालुक्याची कार्यकारणी गठित
का टा वृत्तसेवा I
रामटेक : महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा रामटेक च्या वतीने ‘संत नगाजी महाराज पुण्यतिथी’ व ‘वीर जिवाजी महाले’ जयंती चे औचित्य साधून, रामटेक तालुक्याची कार्यकारणी गठित करण्यात आली. यासाठी श्रीक्षेत्र अंबाळा येथील ‘लोटांगण महाराज धर्मशाळा’ येथे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र नाभिक महामंडळ नागपूर चे जिल्हाध्यक्ष राजेन्द्र फुलबांधे व महीला जिल्हाध्यक्ष मंजुषा पानबुडे हे प्रामुख्याने उपस्थिते होते.
यावेळी सरचिटणीस विनेश कावळे, कार्याध्यक्ष वैभव तुरक, सचिव विजय वलोकर, धरम अतकरे, कोषाध्यक्ष अशोक सुर्यवंशी, उपाध्यक्ष प्रफुल अनकर, संपर्क प्रमुख सतीश सुरुसे, संघटन सचिव रविन्द्र लक्षणे, संघटक जितेंद्र वालुकर, युवा आघाडी उपाध्यक्ष रवि वालुकर तसेच महीला पदाधिकारी रुपाली राऊत, पुजा अतकरे, राजश्री इंगळे, कांचन मिराशे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कौशल्य विकास समीतीचे प्रशिक्षक व मार्गदर्शक धरमजी अतकरे यांनी सर्व सलुन दुकानदार बांधवांच्या समस्या समजून घेतल्या व त्यावर योग्य मार्गदर्शन केले. महीलाध्यक्षांनी सुध्दा महीलांना स़ंघटित राहण्याचे आवाहन केले. जिल्हाध्यक्षांच्या मार्गदर्शनातुन सुध्दा विविध व्यवसायात वाढ व कौशल्याचे महत्व समजावून सांगितले. नाभिक समाजाची जनगणना करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांना पुढील कार्याकरिता शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे संचालन क्रिष्णा कावळे यांनी केले, तर आभारप्रदर्शन जितेंद्र वलोकर यांनी केले. या कार्यक्रमाच्या आयोजनात रामटेक शहरातील समस्त पदाधिकारी यांनी सहकार्य केले. सर्वांनी सामूहिक भोजनाचा आनंद घेवून कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.

रामटेक कार्यकारणीत खालिल नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
सुनिल खुरगे, सुनिल(बबलु) फुलबांधे, सुरेंद्र बोरकर, मनोज पगाडे, कृष्णा कावळे, सचिन वालोकर, रमेश उमरकर, नंदकिशोर पापडकर, देवराज पगाडे, नरेश जांभूळकर, कमलाकर सुरुसे, कृष्णाजी वाटकर, उमेश पापडकर, सनी येऊतकर, रवि पगाडे, राहुल लांजेवार, नत्थुजी चन्ने, संतोष गणोरकर, पीयुष जाभुळकर, विजय फुलबांधे, वैभव पुंडे, रवि फुलबांधे, आशिष येऊतकर, मनोज अनकर, वैभव पुंडे, रवी फुलबांधे, प्रविण अनकर, श्याम वैद्य, गणपत येवतकर, आशीष पापडकर, तुषार कावळे, राजु अनकर, गोविंदा अनकर, दिपक येवतकर, अमोल वानखेडे.
रामटेक महिला आघाडी मध्ये
श्रीमती विमलताई तुरक, कुसुम पापडकर, प्रिती पापडकर, वर्षा वालुकर, वैशाली फुलबांधे, अर्चना अनकर, अवंतिका येऊतकर, प्रमिला पापडकर, भाग्यश्री फुलबांधे, निर्मला लांजेवार, सोनाली पापडकर, सविता लांजेवार, प्रभा पापडकर,सुप्रिया लांजेवार यांचा समावेश आहे.












Users Today : 0
Users Yesterday : 11