चंदननगर पोलिसांकडून कारवाई, आरोपी अटकेत
पुणे : लग्न करण्याचे आमिषाने २४ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी चंदननगर पोलिसांकडून आरोपी तरुण विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अरबाज रशीद शेख (वय २७, रा. जयहिंद चौक, साईनाथनगर मूळ रा. कसाई गल्ली, बारामती, जि. पुणे) असे गु्न्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत एका तरुणीने चंदननगर पाेलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी शेख याची काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर ओळख झाली होती. आरोपीने तिच्याशी ओळख वाढवून लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्या सोबत प्रेमाचे नाटक केले. तिला एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. त्यानंतर मोबाइलवर काढलेली छायाचित्रे पीडित तरुणीची आई आणि भावाला पाठविण्याची धमकी देऊन त्याने ब्लॅकमेल करत तरुणीवर वारंवार बलात्कार केला.
तरुणीने विवाहाबाबत आरोपीला विचारणा केल्यावर त्याने तिला मारहाण करुन शिवीगाळ देखील केली. आरोपीच्या धमकी मुळे घाबरलेल्या तरुणीने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक एन मोरे पुढील तपास करत आहेत.
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तिच्यावर अत्याचार करणार्या एकाला उत्तमनगर पोलिसांनी अटक केली आहे. अथर्व विजय गुडेकर (१९, रा. स्वप्न नंदिनी, बिल्डिंग, शिवणे,पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर बलात्कार, बाल लैंगिक अत्याचाराच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पिडीत मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. आरोपीने केलेल्या अत्याचारामुळे अल्पवयीन मुलगी आठ आठवड्यांची गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत समोर आले आहे.