वरूड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले संयुक्त जयंती उत्साहात साजरी
वरूड (अमरावती) | प्रतिनिधी :
रेल्वे कर्मचारी जयंती समिती, वरूड ऑरेंज सिटी, वरूड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘सामाजिक समता सप्ताह’ अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जयंती उत्सव समिती व रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २० एप्रिल २०२६ रोजी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात संविधानाच्या प्रास्ताविकेच्या सामूहिक वाचनाने झाली. शोभा पाटील, प्रीती पटले, शीतल मोहिते, निशाकुमारी यादव व खुशबू कुमारी यांनी प्रास्ताविकेचे वाचन केले. यानंतर विजयाताई श्रीखंडे व शीलाताई डोंगरे यांनी ‘माझ्या भारत देशात’ हे प्रेरणादायी गीत सादर केले.
यावेळी त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित लघुनाटिका सादर करण्यात आली. रमाईची भूमिका शोभा गौतम पाटील यांनी तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका इंजि. गौतम पाटील यांनी प्रभावीपणे साकारली.

कार्यक्रमात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य रामभाऊ डोंगरे यांनी अंधश्रद्धेविरोधातील भूमिका मांडत बुवाबाबांच्या फसवणुकीचे प्रात्यक्षिक सादर केले. प्रा. कमलनारायण उइके यांनी संविधान विषयावर मार्गदर्शन केले, तर इंजि. अनुप कुमार श्रीवास्तव यांनी विवेकी विचारसरणीवर प्रबोधन केले. मानवतावादी संस्कृती व सामाजिक परिवर्तन या विषयांवर सुदेश महेंगिया व अमित नगराळे यांनी विचार मांडले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुकेश पटले यांनी प्रभावीपणे केले.
या कार्यक्रमासाठी वरूड रेल्वे कॉलनी परिसरातील ज्येष्ठ सभासद रविकांत मोहिते, चंद्रकांत धाकडे ,धीरज कावळे, सुखदेव भलावी ,जितेंद्र कुमार, राकेश रंजन, सुदेश कुमार मंहेग्या, प्रफुल्ल चौधरी, सतीश पोहणे, बाबाराव इंगळे, स्नेहल मेश्राम, सिकंदर यादव, सिताराम मीना, जितेंद्र कुमार, अजित कुमार, चैनसुख मिना, विनोदकुमार मीना, अक्षय जयस्वाल, अखिलेश केवट, भावेश शाहू, अंकित पवार, मनोज शंकर, नीरज कुमार, गुंजन कुमार, कमलेश चौधरी, देवानंद सहारे, मुकुंद नागवंशी, विलास गावंडे, हिमांशू कौशल, संतोष कुमार सिंग, सौरभ कुमार, रौनक सिंग, लक्ष पाटेकर, अस्मित कावळे यांचेसह अनेक ज्येष्ठ व तरुण सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला शंभराहून अधिक कर्मचारी व नागरिकांची उपस्थिती होती.
एकूणच, सामाजिक समता आणि जागरूकतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहात व यशस्वीपणे पार पडला.










Users Today : 27
Users Yesterday : 44
Views Today : 31
Who's Online : 0