December 1, 2025 7:11 am

“श्रीसंत शंकर महाराजांची ब्राह्मवाणी !” पुस्तकाचे प्रकाशन संपन्न!!

“श्रीसंत शंकर महाराजांची ब्राह्मवाणी !” पुस्तकाचे प्रकाशन संपन्न!!

अमरावती :  श्रीक्षेत्र पिपंळखुटा हरितालिका हा परमहंस श्रीसंत शंकर महाराजांचा जन्म दिनाच्या निमित्ताने जन्मोत्सव सोहळा दिनांक २७ ऑगष्ट २०२५ तिर्थक्षेत्र पिपंळखुटा, तालुका धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती येथे अखिल भारतीय श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
                        यावेळी ‘श्रीसंत शंकर महाराजांची ब्राह्मवाणी!’ या पुस्तकाचे प्रकाशनअखिल भारतीय श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस व वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचे निजी सचिव जनार्दन बोथे गुरूजी, गुरूकुंज आश्रम (मोझरी), अखिल भारतीय श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे आजिवन सदस्य हरिभाऊ वेरूळकर गुरूजी, नांदुरा रेल्वे जिल्हा बुलढाणा, ह. भ. प. देवेद्र महाराज वाल्हेकर, पूणे, ह. भ. प. विशाल महाराज खोले, आळंदीकर, ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज कदम, देहूकर, ह. भ. प. रमेश महाराज हरणे, ह. भ. प. उमेश महाराज जाधव, पिंपंळखुटा, अखिल भारतीय श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे प्रचारक व संत साहित्याचे अभ्यासक माणिकदादा बेलूरकर, श्रीक्षेत्र वरखेड, श्रीसंत शंकर महाराज संस्थान, पिपंळखुटा चे उपाध्यक्ष  नंदूसेठ चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

.

यावेळी हजारोंच्या संख्येने भाविक भक्तांनी श्रीसंत शंकर महाराजांची अमृतवाणी या ग्रंथाची मागणी केली. हा अमृतवाणी ग्रंथ श्रीसंत गुलाबराव महाराज माधान यांच्या परिवारातील प्राचार्य भास्कर मोहोड यांनी लेखन केला असून, या श्रीसंत शंकर महाराजांची अमृतवाणी ग्रंथास ह. भ. प. नारायण महाराज जाधव, आळंदीहून बापूसाहेब महाराज देहूकर, गहिनीनाथ महाराज औसेकर, पंढरपूर ह. भ. प. योगीराज महाराज गोसावी, पैठणकर आदि संत महापुरुषांच्या प्रस्तावना लाभलेली आहेत.

या ग्रंथ निर्मिती करीता डॉ. प्रा. स्वप्नील भास्कर मोहोड, प्रा. सौ. केतकी स्वप्नील मोहोड, चि. सोहन स्वप्नील मोहोड, अभियंता सुशांत भास्कर मोहोड, सौ. नेहा सुशांत मोहोड, कुमारी मानवी सुशांत मोहोड, श्रीसंत शंकर महाराज संस्थानचे एकनिष्ठ संत सेवक नंदूसेठ कोकरे, पूणे पालखी पदयात्रा प्रमुख संतसेवक रामदास दांगट, पूणे, संत सेवक मंडळींनी अथक परिश्रम घेतले. सात दिवस चालणाऱ्या जन्मोत्सवाचा शेवट कीर्तन-काला व महाप्रसादाने झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News