सुषमा अंधारेंचे केसरकरांवर गंभीर आरोप

अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट! ‘ब्लॅक मनी’चा अँगल समोर

सुषमा अंधारेंचे केसरकरांवर गंभीर आरोप

मुंबई | राजकीय प्रतिनिधी – भोंदू अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत असून आता या प्रकरणाला आर्थिक गैरव्यवहाराचा नवा अँगल मिळाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत खळबळजनक आरोप करत मोठे प्रश्न उपस्थित केले आहेत.

👉 ‘फोटो पुराव्यांवरून संशय वाढला’

अंधारे यांनी काही छायाचित्रे सादर करत अशोक खरात आणि आमदार दीपक केसरकर यांच्यातील संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “प्रत्येक फोटोमध्ये दिसणारा ‘पिवळ्या शर्टातील’ व्यक्ती नेमका कोण?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

👉 ‘तिसऱ्या व्यक्तीची एंट्री’

अंधारे यांनी या व्यक्तीची ओळख नामकर्ण एकनाथ आवारे अशी असल्याचा दावा केला. “हा व्यक्ती ‘जगदंब पतसंस्थेचा’ प्रमुख असून विविध ठिकाणी केसरकर आणि खरात यांच्यासोबत दिसतो,” असे त्या म्हणाल्या.

👉 ‘ब्लॅक मनी व्हाईट करण्याचा आरोप’

या प्रकरणात अंधारे यांनी सर्वात गंभीर आरोप करत मोठा आर्थिक रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला. “मोठ्या नेत्यांचा आणि अधिकाऱ्यांचा काळा पैसा पतसंस्थेमार्फत पांढरा करण्याचे काम होत असल्याची चर्चा आहे. अशा व्यक्तीचे केसरकरांशी संबंध का?” असा थेट प्रश्न त्यांनी विचारला.

👉 केसरकरांचे आरोप फेटाळले

याआधी दीपक केसरकर यांनी या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगत आरोप फेटाळले होते. “हे सर्व राजकीय कटकारस्थान आहे,” असा दावा त्यांनी केला होता.

👉 ‘स्पष्टीकरण द्यावेच लागेल’ – अंधारे

केसरकरांच्या स्पष्टीकरणावर प्रतिक्रिया देताना अंधारे म्हणाल्या, “त्यांचे विधान बालिश आणि हास्यास्पद आहे. जर त्यांचा काही संबंध नसेल, तर वारंवार एकाच व्यक्तीसोबत त्यांची उपस्थिती का दिसते? या सर्व संबंधांबाबत त्यांनी स्पष्ट उत्तर द्यावे.”


⚠️ राजकारणात खळबळ
अशोक खरात प्रकरणात आता आर्थिक व्यवहारांचा मुद्दा समोर आल्याने राज्यातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे. या आरोपांवर सत्ताधाऱ्यांची प्रतिक्रिया काय येते आणि पुढील तपासात काय उघड होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाेंदू अशाेक खरात : सुषमा अंधारे यांची पत्रकार परिषद 

0
0

Leave a Reply

Realted News