जागतिक सायकल दिनानिमित्त कळमेश्वरात सायकल रॅली उत्साहात
का टा वृत्तसेवा I संजय श्रीखंडे
कळमेश्वर : जागतिक सायकल दिनानिमित्त पोलीस स्टेशन कळमेश्वरच्या वतीने रविवारी (दि. 7 जून 2026) सकाळी क्रीडा संकुल मैदान, कळमेश्वर येथे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. आरोग्य संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि सायकलिंगचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
सायकल रॅलीचे आयोजन सागर खरडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, सावनेर विभाग यांच्या अध्यक्षतेखाली तसेच पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे, ठाणेदार, पोलीस स्टेशन कळमेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

उपस्थित मान्यवरांनी नियमित सायकलिंगमुळे शारीरिक तंदुरुस्ती राखण्यास मदत होते तसेच पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागतो, असे मत व्यक्त केले.
यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक सागर खरडे यांनी कळमेश्वर येथील क्रीडा संकुलाला भेट देऊन खेळाडूंशी संवाद साधला. त्यांनी खेळातील शिस्त, कठोर परिश्रम आणि सातत्याचे महत्त्व पटवून देत खेळाडूंना प्रोत्साहित केले.










