NAGPUR : महाराष्ट्र नाभिक महामंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

महाराष्ट्र नाभिक महामंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

का टा वृत्तसेवा I भूषण सवाईकर

नागपूर, प्रतिनिधी : महाराष्ट्र नाभिक महामंडळ, नागपूर जिल्हा यांच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ नुकताच संत नगाजी महाराज सांस्कृतिक भवन, सी.ए. रोड, महाल, नागपूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. समाजातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. मा. सौ. डॉ. सुवर्णा जांभुळकर (येवले) व प्रा. मा. डॉ. भारती वडजीकर उपस्थित होत्या. तसेच महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रमुख मार्गदर्शक सुधीर राऊत, प्रदेश कार्याध्यक्ष श्याम आस्करकर, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र इंगळे, प्रदेश सचिव राजू चिंचाळकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फुलबांधे, जिल्हाध्यक्षा मंजुषाताई पाणबुडे यांच्यासह समाजातील मान्यवर, पदाधिकारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात दहावी, बारावी तसेच विविध पदवी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. दहावीतील टॉपर ओजस्वी आकाश राजूरकर आणि बारावीतील टॉपर शौर्य मनीष दहेकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देताना कठोर परिश्रम, सातत्य, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण हे सर्वात प्रभावी साधन असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या यशामागील पालकांच्या योगदानाचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन समाजाचे नाव राज्य व देशपातळीवर उज्ज्वल करावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा आघाडी जिल्हाध्यक्ष तुषार मिराशे यांनी केले. सूत्रसंचालन स्मिता नक्षणे यांनी केले तर आभार प्रदर्शन गौरी राजूरकर (अतकर) यांनी मानले. हा सत्कार सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून, उपस्थितांनी कार्यक्रमाचे मनापासून कौतुक केले.

0
0

Leave a Reply

Realted News