का टा वृत्तसेवा I भूषण सवाईकर
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मोहपा शाखेतर्फे वृक्षारोपण अभियान उत्साहात
बसस्थानक, पोलीस ठाणे, नगरपरिषद, एमएसईबी, राजीव गांधी संकुल, स्मशानभूमी व कन्या शाळा परिसरात वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा संदेश
मोहपा : पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मोहपा शाखेच्या वतीने शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण अभियान उत्साहात राबविण्यात आले. बसस्थानक, पोलीस ठाणे, नगरपरिषद कार्यालय, एमएसईबी कार्यालय, राजीव गांधी संकुल, स्मशानभूमी तसेच कन्या शाळा परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला.

स्मशानभूमी परिसरात नगरपरिषद उपाध्यक्ष प्रमोद तपासे व नगरसेवक अजय भिमटे, कन्या शाळा परिसरात नागरी आरोग्यवर्धिनीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निशांत डोंगरे, तर एमएसईबी कार्यालय परिसरात उपकार्यकारी अभियंता मिलिंद राणे, सहाय्यक अभियंता अनिल जाणे आणि प्रफुल वाडबुधे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

बसस्थानक परिसरात प्रवासी प्रीतिका खंडाते व बसस्थानक नियंत्रक मोहन खरबडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पोलीस ठाणे परिसरात पोलीस निरीक्षक ईश्वर हणवते, तर नगरपरिषद कार्यालय परिसरात मुख्याधिकारी सौ. स्नेहलता कुंभार (ढेरे) आणि कळमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

या उपक्रमात सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार त्रिपाठी, संजय वानखेडे, प्रमोद बदखल, दिनेश चांभारे, नगरपरिषदेचे बांधकाम अभियंता पुरुषोत्तम पांडे, तुषार सुखदेवे, संदीप बन्सोड आणि हेमंत बकाने यांच्यासह महात्मा फुले स्टडी सर्कलचे राहुल श्रीखंडे, प्रीतम श्रीखंडे, मयूर पवार, वनदेव डोंगरे आणि प्रवीण राऊळकर उपस्थित होते.
तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्रीराम रंगारी, युवराज डोंगरे, संजय माकोडे, भूषण सवाईकर, विष्णू पोतले, नरेंद्र गणोरकर, हर्षदीप रंगारी, शंकर चिमोटे, प्रविण बदखल, सागर र्कोटकर, कैलास बोरकर, विशेष वाहणे आणि शिवशंकर काऊलकर यांनीही उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
यावेळी पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि सामाजिक सहभागाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. अधिकाधिक वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन उपस्थित नागरिकांना करण्यात आले.










