गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कळमेश्वर पोलिसांचा रूट मार्च; अँटी टेरर ड्रिल व रेस्क्यू ऑपरेशनचा सराव
कळमेश्वर | प्रतिनिधी : आगामी गणेश विसर्जन आणि सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कळमेश्वर पोलिसांनी मंगळवारी (दि. २२ सप्टेंबर) रूट मार्च, अँटी टेरर मॉक ड्रिल आणि रेस्क्यू ऑपरेशनचे प्रात्यक्षिक घेतले. या सरावातून पोलिसांची सुरक्षा सज्जता आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची क्षमता तपासण्यात आली.
सकाळी ११ ते दुपारी १२.३० वाजेदरम्यान पोलीस उपनिरीक्षक अरुण नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम पार पडला. यामध्ये मुख्यालयातील अधिकारी, २० क्यूआरटी अंमलदार, कळमेश्वर पोलीस स्टेशनचे अधिकारी-कर्मचारी आणि होमगार्ड जवान सहभागी झाले होते.

पोलीस स्टेशन ते तळ्याची पार परिसरापर्यंत रूट मार्च काढण्यात आला. त्यानंतर संभाव्य दहशतवादी हल्ल्याच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मॉक ड्रिल, तसेच नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविणे आणि बचावकार्य करण्याबाबत रेस्क्यू ऑपरेशनचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
नागरिकांना आवाहन : गणेश विसर्जन व सण-उत्सवांच्या काळात नागरिकांनी शांतता आणि सुव्यवस्था राखावी, पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तातडीने पोलिसांना कळवावे. संपूर्ण सराव शांततेत पार पडल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क
सतीश पांडे : 📲 9561480227






