आशियाई जलतरण स्पर्धेसाठी नागपुरच्या कुलदीपची निवड; मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव!

बंगळुरू येथे ४ ते १० ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या दुसऱ्या आशियाई मास्टर्स जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार

नागपुर : क्रीडा क्षेत्रात नागपुरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी अभिमानास्पद घटना घडली आहे. कुलदीप पुनाराम यांची दुसऱ्या आशियाई मास्टर्स जलतरण अजिंक्यपद स्पर्धा २०२६ साठी निवड झाली असून, त्यांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अधिकृत निमंत्रण प्राप्त झाले आहे. या यशाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बंगळुरू येथे ४ ते १० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. आशियाई जलचर क्रीडा संघटनेच्या (Asian Aquatics) मार्गदर्शनाखाली, भारतीय जलतरण महासंघाच्या आयोजनातून आणि कर्नाटक जलतरण संघटनेच्या स्थानिक आयोजन समितीमार्फत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कुलदीप यांनी स्पर्धेसाठी नोंदणी पूर्ण केली असून, त्यांचा महाराष्ट्र संघात समावेश असल्याचे अधिकृत निमंत्रणपत्रात नमूद आहे.

कुलदीप यांच्या या कामगिरीबद्दल विशाल सर प्रशिक्षक, आदित्य काळेले, सूर्यकांत राहिले, सुरी बाबू, वीरेन अडसड, विनोद फुलझेले, राजेंद्र, संजयजी बटवे सर, भोजराज सर, निखिल, उर्मित पटेल, ॲड. तन्मय शेंडे, मनीष मांडवकर, अशोक कडू, हिमांशू क्षीरसागर, अभिराज शेंडे तसेच फ्रेंड्स कॉलनी युवा मंच नागपुरच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

कुलदीप यांच्या या सहभागामुळे नागपुरसह महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी स्पर्धेत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून यश संपादन करावे, अशा सदिच्छा व्यक्त होत आहेत.

0
0

Leave a Reply

Realted News