मोदींबाबतच्या वक्तव्यावरून खरगेंविरोधात पोलीस तक्रार

मुख्यमंत्री सम्राट चौधरींची राहुल गांधी व खरगेंकडे माफीची मागणी; भाजप नेत्यांकडून टीका

का टा वृत्तसेवा I

पाटणा  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत कथित अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याविरोधात पाटण्यातील कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेश कार्यसमिती सदस्य कृष्णा कुमार सिंह यांनी तक्रार देत वक्तव्याची चौकशी करून योग्य कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

नेमके प्रकरण काय?

पाटणा येथील काँग्रेसच्या कार्यक्रमात खरगे यांनी, “मोदी काय, मोदींचा बापही जाईल,” असे वक्तव्य केल्याचा आरोप आहे. या वक्तव्यावरून भाजप नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सम्राट चौधरींची माफीची मागणी

बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी या वक्तव्याचा निषेध करत राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही काँग्रेसवर टीका करत सार्वजनिक जीवनात भाषेची मर्यादा पाळण्याचे आवाहन केले.

दरम्यान, तक्रारदाराने संबंधित व्हिडिओ, बातम्या आणि इतर पुराव्यांची तपासणी करून वक्तव्याचे नेमके शब्द व संदर्भ निश्चित करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात पोलिसांकडून काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.


 

0
0

Leave a Reply

Realted News