फेटरी–माहूरझरी बायपासवर भीषण अपघात; २७ वर्षीय आदित्य दहाटे यांचा मृत्यू

फेटरी–माहूरझरी बायपासवरील कामठी रोडवर झालेल्या भीषण अपघात AI Image

रात्रीची ड्युटी संपवून घरी परतताना काळाचा घाला

कळमेश्वर | प्रतिनिधी : नागपूर जिल्ह्यातील फेटरी–माहूरझरी बायपासवरील कामठी रोडवर झालेल्या भीषण अपघातात आदित्य दहाटे (वय २७, रा. नांदा, कोराडी) यांचा मृत्यू झाला. ते गोंडखैरी येथील Shadowfax वेअरहाऊसमध्ये कार्यरत होते. रात्रीची ड्युटी संपवून घरी परतत असताना त्यांच्या वाहनाचा (क्रमांक MH 40 CR 9163) अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

माहिती मिळताच देव्यांशी फाउंडेशनची मदत

अपघाताची माहिती मिळताच देव्यांशी फाउंडेशनची ॲम्बुलन्स तातडीने घटनास्थळी दाखल झाली. सामाजिक कार्यकर्ते व रुग्णसेवक मंगेश गमे यांच्या पुढाकारातून मदतकार्य करण्यात आले. त्यानंतर आदित्य दहाटे यांचा मृतदेह ॲम्बुलन्समधून ग्रामीण रुग्णालय, कळमेश्वर येथे नेण्यात आला.

पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू

अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कळमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय नागरगोजे, पोलीस कर्मचारी रेवतकर आणि गिरीश मोहोड पुढील तपास करीत आहेत.

रात्रीची ड्युटी संपवून घरी परतणाऱ्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याने नातेवाईक आणि परिचितांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. अपघात नेमका कसा घडला, याचा उलगडा पोलीस तपासानंतर होणार आहे.

1
0

Leave a Reply

Realted News