धापेवाडा येथे दुचाकीचा अपघात; ५७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, पत्नी किरकोळ जखमी

धापेवाडा येथे दुचाकीचा अपघात; ५७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, पत्नी किरकोळ जखमी

कळमेश्वर, दि. ३१ ऑक्टोबर  : कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४७ वरील कळमेश्वर–सावनेर मार्गावर धापेवाडा येथील रेणुका मंदिराजवळ आज दुपारी सुमारे २ ते २.३० वाजताच्या दरम्यान दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गुणवंता भैय्याजी मोहोड (वय ५७, रा. मालेगाव, सावनेर रोड) यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नीला किरकोळ दुखापत झाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, भैय्याजी मोहोड हे पत्नीसमवेत मुलीच्या घरून दुचाकीने परत येत असताना त्यांच्या दुचाकीचे (क्रमांक MH 40 J 5631) रेणुका मंदिराजवळ संतुलन बिघडल्याने अपघात घडला. या दुर्घटनेत मोहोड यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीला किरकोळ दुखापत झाली असून त्यांची प्रकृती सुखरूप असल्याची माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी आवश्यक कार्यवाही केली. या प्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी मर्ग क्रमांक १०५ वर झालेल्या अपघाताची नोंद करून पुढील तपास करीत आहेत.

0
0

Leave a Reply

Realted News