शेतकरी कुटुंबासोबत मुख्यमंत्र्यांची दिवाळी; लोहारी सावंग्यात केला मुक्काम!

शेतकरी कुटुंबासोबत मुख्यमंत्र्यांची दिवाळी; लोहारी सावंग्यात केला मुक्काम!

रामभाऊ बालपांडे यांच्या घरी सदिच्छा भेट; भजनात सहभाग घेत शेतकऱ्यांशी साधला थेट संवाद

नागपूर : शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाची दिवाळी नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा येथे शेतकऱ्यांसोबत साजरी केली. यावेळी त्यांनी शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या निवासस्थानी भेट देत कुटुंबीयांशी संवाद साधला. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांनी गावात मुक्कामही केला.

यानंतर त्यांनी गुरुदेव सेवाश्रमाला भेट देऊन सामुदायिक प्रार्थना व भजन कार्यक्रमात सहभाग घेतला. खंजिरी आणि टाळ वाजवत त्यांनी स्वतः भजनही गायले. तसेच ग्रामपंचायत परिसरात शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या. शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या या उपक्रमाची परिसरात चर्चा होत आहे.

0
0

Leave a Reply

Realted News