प्रभु ! हा खेळ दुनियेचा, कशाला सांग केलासी ?
विज्ञानाने अनेक शोध लावले. भारताच्या स्वातंत्र्याने ७५ वर्ष पूर्ण केले. पण साधूसंतमहापुरूषांचा हा देश ज्या माणूसकीमुळे जगाला प्रीय होता. आम्ही फाटके जरी होतो, तरी मानवता, माणूसकी आमची शाबूत होती. आज शिक्षणाने आमच्या डीगऱ्या वाढवल्या, पण वृध्दाश्रमाची निर्मीती पण केली. काल आम्ही पुसद शहराच्या शासकीय रूग्नालय परिसरात ‘माणूसकीची भिंत’ या संस्थेच्या गरीब रूग्नांच्या नातेवाईकांना भोजनदानाच्या उपक्रमाला भेट दीली.
एका आजीची भेट झाली. मुल असूनही ती कुटुंब प्रेमापासून दुरावलेली. आमच्या स्वागताची शाल रवीदादा मानवांनी तीच्या गळ्यात घातली. तीच्या डोळ्यातील अश्रु ममतेचा ओलावा देत आमच्या पाठीवरून मातृत्वाचा हात फीरवीत होती. ज्ञानेश्वरदादा रक्षक, नामदेव ग़व्हाळे महाराज आम्हा सर्वांना गहीवरून आले.

माणूसकीची भिंत चालवीणारे गजानन जाधव दादा, मधुकर चव्हान, प्रबोधनकार पंकजपाल राठोड सांगत होते. याच शासकीय रूग्नालय परिसरात एका जीवंत रूग्न बापाला सोडून दीलेला, त्याला उठता येत नव्हते. या सेवाभावी मित्रांना हा बाप भेटला, यांनी सेवा दीली. पण तो वाचू शकला नाही. नंतर फेसबुकवर व्हायरल पोस्टवरून नातेवाईक भेटले. त्यांना त्याच्या मृत्युचा दाखला हवा असेल, त्याची संपत्ती आपल्या नावावर करता यावी म्हणून.
माणूसकीच्या भिंतीने आमच्यातील माणूसकीची जाणीव करून दीली त्यांचे आभार !
कुणाला भाग्य देवोनी, बसविले मंचकावरती ।
कुणी किति कष्ट जरि केले, तरी राहतात उपवासी ॥
म्हणे तुकड्या तुझी लीला, पाहता वेद मौनावे ।
दीन आम्हि काय सांगावे, तुझी माया असे कैसी ? ॥











Users Today : 2
Users Yesterday : 11