February 7, 2026 8:50 am

घरफोडीतील दोन अट्टल गुन्हेगारांना अटक : कारंजा (घा.) पोलीसांची कारवाई 

घरफोडीतील दोन अट्टल गुन्हेगारांना अटक

3 घरफोड्यातील 2,13,000 रू. चा माल हस्तगत] कारंजा (घा.) पोलीसांची कारवाई 

कारंजा (घा.) : पो.स्टे. कारंजा (घा.) हद्दीत झालेल्या घरफोडीतील अट्टल/ सराईत गुन्हेगारांना अटक करून तीन गुन्हे उघडकीस आणून मालमत्ता हस्तगत करण्यात  पोलीसांना यश आले आहे. आजघडीला चोरी घरफोडीसारख्या प्रकरणांमध्ये चोरीस गेलेला माल तर सोडाच, परंतू आरोपींचा सुगावा लागणे अशक्य असल्याचे नागरिकांचे मत आहे. परंतू कारंजा (घा.) पोलीसांनी हे शक्य असल्याचे दाखवून दिले आहे.
                       ही उल्लेखणीय बाब कारंजा (घा.) पोलीसांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केली आहे. दिनांक 11/07/2025 रोजी पो.स्टे हद्दीतील मौजा नारा येथील सुनिल किनकर, बेलगांव येथील छत्रपाल चोपडे व पो.स्टे. आष्टी हद्दीतील अमोल पाटील यांचे बंद घराचे कुलूप तोडून तसेच दिनांक 06/08/2025 रोजी पो.स्टे. कारंजा घाडगे हद्दीतील मौजा काजळी येथील सिमा टोपले यांचे बंद घराचे कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने व नगदी रक्कम चोरुन नेली.
                       फिर्यादींच्या तोंडी रिपोर्टवरुन पो.स्टे. कारंजा येथे अप.क्र.496/2025 व अप.क्र.531/2025 कलम 331 (3), 305 (अ) भा.न्या.सं. अन्वये तसेच पो.स्टे. आष्टी येथे अप.क्र. 203/2025 कलम 331 (3), 305 (अ) भा.न्या.सं. अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले होते.
                      पो.स्टे. कारंजा घाडगे पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर यांनी आरोपींच्या शोधार्थ पथक तयार करुन अज्ञात आरोपींचा शोध घेवून अट्टल चोरटा करणसिंग जंगसिंग भादा, वय 25 वर्षे रा. कबाडी मोहल्ला पांढुर्णा (मध्यप्रदेश) व दुसरा अक्षय सुधाकर शेलके, वय 19 वर्षे रा. जवाहर वार्ड, पांढुर्णा (मध्यप्रदेश) या दोन्ही आरोपीतांना गुन्ह्यात अटक केली. आरोपी करणसिंग जंगसिंग भादा याचे कडून त्याने गुन्ह्यात वापरलेल्या विना क्रमांकाच्या टि.व्ही.एस. अपाची मोटार सायकलसह चोरीस गेलेला एक सोन्याचा गोफ, एक सोन्याची गरसोळी, एक सोन्याचे पदक, सोन्याचे कानातील झुमके, सोन्याच्या 4 आंगठ्या, 5 तोळ्याची चांदीची पायल व नगदी 70,000/-रु. असा एकुण 2,13,000/- रु. चा मुद्देमाल चोरट्यांकडून हस्तगत केला.
                    सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक वर्धा अनुराग जैन, मा. अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर ढोले, पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर यांचे मार्गदर्शनात पो. उप निरीक्षक सतिश जायभाये, पोलीस कर्मचारी लिलाधर उकंडे, निलेश पेटकर, नितेश मैदपवार, दिनेश घसाड, अमोल मानमोडे, रितेश चैधरी, होमगार्ड सैनिक विनोद वानसकर, अक्षय नरसिंगकार, खुशाल नेहारे व फैजान शेख यांनी केली.
0
0

Leave a Reply

Realted News