कलमेश्वरमध्ये उत्साहात ‘ईद’ साजरी

कलमेश्वरमध्ये उत्साहात ‘ईद’ साजरी

मस्जिद व ईदगाहमध्ये नमाज; नागरिकांनी गळाभेट घेऊन दिल्या शुभेच्छा

कलमेश्वर : कलमेश्वर-ब्राम्हणी परिसरात शनिवारी मुस्लिम बांधवांनी ईद-उल-फित्र (रमजान ईद) मोठ्या उत्साहात व धार्मिक श्रद्धेने साजरी केली. शहरातील विविध मस्जिदी तसेच ईदगाह येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून नमाज अदा करण्यात आली. यानंतर नागरिकांनी एकमेकांना गळाभेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या.

                          या प्रसंगी भाजप नेते डॉ. राजीव पोतदार यांनी ईदगाह येथे भेट देऊन मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या संदेशात सांगितले की, ईद हा सण केवळ रोजे पूर्ण झाल्याचा आनंद नसून, तो प्रेम, शांतता आणि बंधुभावाचे प्रतीक आहे. शहरातील गंगा-जमुनी संस्कृती हीच आपल्या एकतेची खरी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

                         यावेळी नगरसेवक मनोज शेंडे, समीर शेख, शेखजी शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच मस्जिदींमध्ये साबिर शेख, मुश्ताक शेख, शेख जमीर अहमद, राशीद शेख, इमरान पठाण, जस्मीन शेख, बबलू शेख आणि इतर मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली.

                          ईदच्या निमित्ताने शहरातील मस्जिदींना आकर्षक रोषणाई करण्यात आली होती, त्यामुळे संपूर्ण परिसरात आनंददायी वातावरण निर्माण झाले होते. ईदच्या सणानिमित्त कलमेश्वरमध्ये सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि सांस्कृतिक सलोख्याचे सुंदर चित्र पाहायला मिळाले.

0
0

Leave a Reply

Realted News