तहसीलदारच्या कॅबिनमध्ये सीसीटीव्ही बसवा; ते कलेक्टरांच्या चेबरला जोडा, मंत्री बावनकुळेंचे आदेश

भ्रष्टाचारावर लगाम : तहसीलदार-एसडीएम कॅबिनमध्ये CCTV अनिवार्य

– मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

भंडारा – प्रशासनातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कडक भूमिका घेत तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी (SDM) यांच्या कॅबिनमध्ये CCTV कॅमेरे बसवण्याचे आदेश दिले आहेत. या कॅमेर्‍यांचे थेट निरीक्षण जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयातून करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

लाखांदूर येथे सुमारे २२ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी महसूल व पोलिस विभागाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

 “टेबलाखालून पैसे घेतले तर थेट कारवाई”

मंत्री बावनकुळे म्हणाले की,

“इमारती भव्य झाल्या म्हणून प्रशासन लोकाभिमुख होत नाही. जर नागरिकांची कामे अजूनही पैशांशिवाय होत नसतील, तर अशा इमारतींचा उपयोग नाही.”

पारदर्शकता वाढवण्यासाठी सर्व महत्त्वाच्या कॅबिनमध्ये CCTV बसवून त्यावर वरिष्ठ पातळीवर देखरेख ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पोलिसांना इशारा: ‘माफियांना अभय देऊ नका’

कार्यक्रमात उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांनाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला.
  • अवैध धंद्यांशी संबंध आढळल्यास थेट बडतर्फी
  • कोणत्याही माफियांना संरक्षण न देण्याचे आदेश

नागरिकांसाठी ‘भेटीची वेळ’ अनिवार्य

प्रशासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी उपलब्ध नसल्याच्या तक्रारींवर उपाय म्हणून,

  • प्रत्येक विभाग प्रमुखाने भेटीची वेळ फलकावर नमूद करणे बंधनकारक
  • माहितीफलक नसल्याबद्दल नाराजी व्यक्त

शेतकऱ्यांसाठी दिलासा

यावेळी मंत्री बावनकुळे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही भाष्य करत:

  • धान उत्पादकांना बोनस मिळवण्यासाठी प्रयत्न
  • न विकलेल्या धानासाठी न्याय
  • समृद्धी महामार्ग प्रकल्पग्रस्तांना योग्य नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन
0
0

Leave a Reply

Realted News