कारंजा तालुक्यातील प्रियदर्शनी महिला पतसंस्थेचा गौरव

कारंजा तालुक्यातील प्रियदर्शनी महिला पतसंस्थेचा गौरव

कारंजा  : कारंजा तालुक्यातील प्रियदर्शनी महिला सहकारी पतसंस्था हिला वर्धा येथे आयोजित सहकार परिषदेत सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी वर्धा जिल्हा पगारदार कर्मचारी सह पतसंस्था संघ यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे सहकार राज्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते संस्थेला गौरव प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

संस्थेच्या वतीने अध्यक्षा सौ. हिराताई विजयराव खवशी, उपाध्यक्ष सौ. जयश्री नितीन चोपडे, संचालिका सौ. अर्चनाताई बनगरे आणि व्यवस्थापक हेमराज बन्नगरे यांनी हा सन्मान स्वीकारला.

कार्यक्रमाला वर्धा जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे, जिल्हा कर्मचारी पगारदार सहकारी संघाचे अध्यक्ष प्रशांत भोयर, तसेच उपाध्यक्ष व मार्गदर्शक नंदकुमार वरकड यांच्यासह जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सन्मानाबद्दल प्रियदर्शनी महिला पतसंस्थेच्या वतीने कारंजा तालुक्यातील सर्व सदस्य, संबंधित घटक तसेच वर्धा जिल्हा पगारदार कर्मचारी पतसंस्था संघाचे आभार व्यक्त करण्यात आले.

👉 सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे या संस्थेचा सन्मान करण्यात आल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

0
0

Leave a Reply

Realted News