NEET पेपरफुटी प्रकरण तापले; राहुल गांधींचा भाजपवर निशाणा

NEET पेपरफुटी प्रकरण तापले; राहुल गांधींचा भाजपवर निशाणा

                    देशभरात वैद्यकीय शिक्षणासाठी घेतल्या जाणाऱ्या NEET परीक्षेच्या कथित पेपरफुटी प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. 3 मे रोजी घेण्यात आलेल्या या परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप समोर आल्यानंतर केंद्र सरकार आणि परीक्षा व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, नव्याने परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या प्रकरणाचा तपासही सुरू करण्यात आला आहे.

दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते Rahul Gandhi यांनी या प्रकरणावरून भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीशी खेळ झाल्याचा आरोप केला.

File photo
File photo

“लाखो विद्यार्थ्यांची मेहनत भाजपच्या भ्रष्ट व्यवस्थेमुळे वाया गेली. ही घटना अयोग्य व्यवस्थापनाचे उदाहरण असून पेपरफुटीसाठी भाजपच जबाबदार आहे,” असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

पुढे त्यांनी, “हे केवळ अपयश नसून देशातील तरुणांच्या भविष्याविरोधात केलेला गुन्हा आहे,” असा घणाघातही केला.

NEET पेपरफुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये संतापाचे वातावरण असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

0
0

Leave a Reply

Realted News