अखिलेश यादव यांना मोठा धक्का; सावत्र भाऊ प्रतीक यादव यांचे निधन

अखिलेश यादव यांना मोठा धक्का; सावत्र भाऊ प्रतीक यादव यांचे निधन

लखनऊ : Akhilesh Yadav यांचे सावत्र भाऊ आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक Mulayam Singh Yadav यांचे पुत्र प्रतीक यादव यांचे निधन झाले आहे. लखनऊ येथील शासकीय सिव्हिल रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे यादव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकृती अस्थिर झाल्यानंतर प्रतीक यादव यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

प्रतीक यादव हे अवघ्या 38 वर्षांचे होते. ते Mulayam Singh Yadav आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नी साधना गुप्ता यांचे पुत्र होते. तसेच ते भाजप नेत्या Aparna Yadav यांचे पती होते. निधनाच्या वेळी कुटुंबीय त्यांच्या सोबत उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे.

राजकारणापासून दूर राहिलेले व्यक्तिमत्त्व

राजकीय घराण्यात जन्म असूनही प्रतीक यादव यांनी सक्रिय राजकारणापासून कायम अंतर ठेवले. त्यांनी रिअल इस्टेट आणि फिटनेस व्यवसायात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. लखनऊमध्ये त्यांचा जिम व्यवसायही होता.

प्रतीक यादव यांनी युनायटेड किंगडममधील लंडन येथून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले होते. फिटनेसची विशेष आवड असलेल्या प्रतीक यांनी कधीही निवडणूक लढवली नाही किंवा पक्षात कोणतेही मोठे पद स्वीकारले नाही.

त्यांच्या अकाली निधनामुळे यादव कुटुंबासह समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

0
0

Leave a Reply

Realted News