इस्रायलच्या मोसाद मुख्यालयावर इराणचा हल्ला
लष्करी गुप्तचर इमारतीलाही लक्ष्य केले; इस्रायलने इराणी सैन्याच्या डेप्युटी कमांडरची हत्या केली तेहरान/तेल अवीव : इस्रायल आणि इराणमधील संघर्ष पाचव्या दिवशीही सुरू आहे. मंगळवारी इराणने तेल अवीव येथील इस्रायलच्या गुप्तचर संस्थेच्या मोसादच्या मुख्यालयावर हवाई हल्ला केला. याशिवाय लष्करी गुप्तचर संस्थेशी संबंधित अमान या गुप्तचर संस्थेच्या इमारतीलाही लक्ष्य करण्यात आले आहे. …