रोहना व इंदूरखा परिसरातील प्रकल्पासाठी घेतलेली शेतकऱ्यांची जमीन विकण्याचा कट
प्रकल्प उभारा किंवा आमची जमीन परत करा : धोकाधडी विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
का टा वृत्तसेवा I विश्वकांत भुजाडे
भंडारा (मोहाडी) : मोहाडी तालुक्यातील रोहना व इंदूरखा परिसरातील ६४० एकर सुपीक जमीन थर्मल पावर कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड हैदराबादने पॉवरप्लॅन्ट लावण्यासाठी विकत घेतली होती. यातून शेतकऱ्यांना रोजगार मिळेल असे आश्वासन दिले होते मात्र सदर जमिनीवर कुठलेच प्रकल्प न उभारता ती परस्पर विकण्याचा कट थर्मल पावर कंपनीने आखला होता. या विरोधात शेतकऱ्यांनी एल्गार उभारला. विश्वनाथ बांडेबुचेच्या मध्यस्थीने परिणय फुके यांनी विक्री थांबविण्यावे निर्देश जिल्हाधिकऱ्यांना दिल्याची माहिती आहे.
शासकीय नियमानुसार २०११ मध्ये रोहना व इंदूरखा गावातील तब्बल ६४० एकर थर्मल पावर कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड हैदराबादने पावर प्लॅन्ट साठी खरेदी केली जमीन सुपीक होती सदर परिसरात बावनथडी प्रकल्पाचे पाणी येत असल्यामुळे शेतातून चांगले उत्त्पन्न निघत होते. मात्र शेतकयांना नोकरी देऊ व एनटीपीसीसारख्या सुविधा देऊ असे आश्वासन दिले गेले. जमिनी विकणे शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष मनात नव्हते. मात्र परंतु मुलाना उज्ज्वल भविष्य मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी जमीन विकली.
मात्र अनेक वर्षे लोटून सुद्धा कोणतेही काम सुरू केले नाही. उलट शेती आयडीबीआय बैंक हैदराबाद येथे गहाण केली. बँक अधिकाऱ्यांनीही जमीन विकण्याकरिता काढली व आपले दलाल नेमून दिले. यामुळे रोजगारही नाही आणी शेती हातातून जाणार यामुळे शेतकरी चिंतातूर झाला. एक तर प्रकल्प उभरा किंवा आमची जमीन परत करा अशी मागणी शेतकऱ्यांनी करीत आंदोलन उभारले. बळीराजा शेती बचाव संघर्ष संघटनेची स्थापना करण्यात आली.

सदर बाब माहित होताच सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ बांडेबुचे हे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरसावले. विश्वनाथ बांडेबूचे यांच्या नेतृत्वात आमदार परिणयजी फुके यांना निवेदन देण्यात आले. आ. फुके हे शेतकऱ्यांच्या मागणीला दुजोरा देत सदर जमिनीचे शेतकरी उपस्थित होते. विक्री थांबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांना दिल्याचे समजते. त्या प्रसंगी उपस्थित बळीराजा शेती बचाव संघर्ष संघटना चे अध्यक्ष सुदर्शन आगाशे, उपाध्यक्ष कुंदन गरपडे, सचिव उत्तम पंचबुधे, अंकुश आगाशे, उत्तम टिचकुले, पराग आगाशे, खोपडू पोटफोडे, धानेश्वर आगाशे इत्यादी शेतकरी उपस्थित होते.















Users Today : 27
Users Yesterday : 44
Views Today : 31
Who's Online : 0