TVK सरकारला 144 आमदारांचा पाठिंबा : बहुमत चाचणीत विजय सरकारने बहुमत सिद्ध

तामिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ

विजय सरकारला पाठिंबा देणाऱ्या 25 आमदारांवर AIADMK ची कारवाई

बहुमत चाचणीनंतर पक्षपदांवरून हटवले; TVK सरकारला 144 आमदारांचा पाठिंबा

Vijay यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तामिळनाडू विधानसभेत पार पडलेल्या बहुमत चाचणीत त्यांच्या सरकारने बहुमत सिद्ध केले. मात्र, या चाचणीदरम्यान All India Anna Dravida Munnetra Kazhagam मधील काही बंडखोर आमदारांनी TVK सरकारच्या बाजूने मतदान केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे.

AIADMK नेतृत्वाने पक्षाच्या भूमिकेविरोधात जाऊन मतदान करणाऱ्या आमदारांवर तातडीने कारवाई सुरू केली असून, तब्बल 25 आमदारांना पक्षातील महत्त्वाच्या पदांवरून हटवण्यात आले आहे. या निर्णयामुळे तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

बंडखोर आमदारांवर कठोर कारवाई

AIADMK चे महासचिव Edappadi K. Palaniswami यांनी बुधवारी पक्षशिस्तभंगाची कारवाई जाहीर केली. सी. व्ही. शणमुगम, एस. पी. वेलुमणी, एम. आर. विजयभास्कर यांच्यासह अनेक नेत्यांना पक्षपदांवरून हटवण्यात आले आहे.

विश्वासदर्शक ठरावावेळी TVK सरकारच्या समर्थनार्थ मतदान करणारे नाथम आर. विश्वनाथम आणि इतर बंडखोर आमदारांवरही कारवाई करण्यात आली. पलानीस्वामी यांनी या 25 आमदारांच्या जागी नवीन जिल्हा सचिवांची नियुक्ती केली आहे.

TVK सरकारला 144 आमदारांचा पाठिंबा

समोर आलेल्या माहितीनुसार, AIADMK ने 13 विद्यमान आमदारांसह एकूण 29 नेत्यांना विविध पदांवरून हटवले आहे. यामध्ये आर. कामराज, थंगामणी, के. पी. अन्बझगन, बेंजामिन, उदुमलाई राधाकृष्णन, एसाकी सुब्बैया, एम. सी. संपत आणि के. सी. वीरमणी यांसारख्या वरिष्ठ नेत्यांचाही समावेश आहे.

सी. व्ही. शणमुगम आणि एस. पी. वेलुमणी यांच्या समर्थनार्थ एकत्र आलेल्या 25 आमदारांच्या क्रॉस-वोटिंगमुळे विजय यांच्या सरकारचे संख्याबळ अधिक मजबूत झाले. बहुमत चाचणीनंतर TVK सरकारला एकूण 144 आमदारांचा पाठिंबा मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

DMK चा वॉकआउट, भाजप तटस्थ

बहुमत चाचणीदरम्यान Dravida Munnetra Kazhagam च्या आमदारांनी सभागृहातून वॉकआउट केले. तर Pattali Makkal Katchi ने मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला नाही. भाजपच्या एकमेव आमदाराने तटस्थ भूमिका घेतली.

दरम्यान, पलानीस्वामी यांच्याशी निष्ठावान असलेल्या 21 AIADMK आमदारांनी सरकारविरोधात मतदान केले. बंडखोर नेते सी. व्ही. शणमुगम यांनी TVK आणि AIADMK यांचा वैचारिक अजेंडा समान असल्याचा दावा करत, दोन्ही पक्ष DMK विरोधी भूमिका घेत असल्याने काही आमदारांनी सरकारला पाठिंबा दिल्याचे सांगितले.

0
0

Leave a Reply

Realted News