दारूबंदी जिल्ह्यात दारू जप्त – काटोलवरून कारंज्याकडे येणारा आरोपी अटकेत
होंडा कारसह देशी-विदेशी दारूचा मोठा साठा जप्त – पोलिसांची कारवाई
कारंजा/प्रतिनिधी : दिनांक 29 रोजी गोपनीय खबरीच्या माहितीनुसार काटोलवरून कारंज्याकडे आणली जात असलेली दारू कारंजा पोलिसांनी जप्त केली. आरोपी निखील उर्फ बुची प्रभाकर बोडखे (वय 24, रा. खर्डीपुरा, कारंजा घाडगे) याला होंडा मोबीलीवो (क्र. MH-04 GZ 8396) चारचाकीसह ताब्यात घेतले.
या वाहनातून देशी व विदेशी दारू किंमत ₹24,800 आणि वाहनाची किंमत मिळून एकूण ₹5,24,800/- इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी काटोल येथून बोरी फाटा मार्गे कारंज्याकडे येत असताना ही कारवाई करण्यात आली.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सागर महल्ले, पोलीस हवालदार निलेश पेटकर व पोलीस अंमलदार रितेश चौधरी यांनी केली. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये अप. क्र. 684/2025 अंतर्गत कलम 65 (अ)(ई), 77(अ) म.दा.का. तसेच मोटार वाहन कायदा कलम 3(1)/181, 130/177 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर ढोले व पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.