कळमेश्वर : पी.एम. श्री नगरपरिषद विद्यालयाचा बारावी निकाल 94.06%

कळमेश्वर : पी.एम. श्री नगरपरिषद विद्यालयाचा बारावी निकाल 94.06%

कळमेश्वर : येथील पी.एम. श्री नगरपरिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता 12 वीचा (सन 2026) निकाल जाहीर झाला असून, शाळेचा एकूण निकाल 94.06 टक्के लागला आहे. या यशामुळे शाळेने पुन्हा एकदा उत्कृष्ट शैक्षणिक परंपरा कायम राखली आहे.

यंदा परीक्षेसाठी एकूण 222 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. त्यापैकी 219 विद्यार्थी परीक्षेला बसले असून, 206 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

विभागनिहाय निकाल

  • विज्ञान शाखा : 93 पैकी 92 विद्यार्थी उत्तीर्ण (98.92%)
  • कला शाखा : 53 पैकी 42 विद्यार्थी उत्तीर्ण (79.24%)
  • वाणिज्य शाखा : 73 पैकी 72 विद्यार्थी उत्तीर्ण (98.63%)

गुणवंत विद्यार्थी

विज्ञान शाखा

  1. यश प्रेमराज पवार – 525/600 (87.50%)
  2. प्रीत सुभाष श्रीखंडे – 508/600 (84.67%)
  3. गुंजन रमेश भोयर – 463/600 (77.17%)
  4. सार्थक आमप्रकाश सिंग – 463/600 (77.17%)

वाणिज्य शाखा

  1. पृथ्वीराज विजयराव इंगळे – 526/600 (87.67%)
  2. साहिल राजेंद्र येलेकर – 494/600 (82.33%)
  3. निवेदिता देवराव चौधरी – 453/600 (75.50%)

कला शाखा

  1. गौरव धनराज पारसे – 412/600 (68.67%)
  2. कु. दिव्या सेवक माहुले – 388/600 (64.67%)
  3. अश्वजीत नारायण तरवटकर – 379/600 (63.17%)

शाळेच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग तसेच पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

0
0

Leave a Reply

Realted News