नागपूर विभागाचा बारावी निकाल ८८.६७%
राज्यात आठवे स्थान कायम; मुलींची पुन्हा सरशी
नागपूर | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या बारावी (इयत्ता १२वी) परीक्षेच्या निकालात नागपूर विभागाचा एकूण निकाल ८८.६७ टक्के लागला आहे. यंदाही मुलींनी उजवी कामगिरी करत मुलांवर मात केली असून विभागाने राज्यात आठवे स्थान कायम राखले आहे.
मागील वर्षांच्या तुलनेत घसरण
नागपूर विभागाचा निकाल यावर्षी मागील काही वर्षांच्या तुलनेत किंचित घसरलेला दिसतो.
- २०२५: ९०.५२%
- २०२३-२४: ९२.१२%
- २०२२-२३: ९०.३५%
एकूण विद्यार्थ्यांची आकडेवारी
यंदा नागपूर विभागातून १,५३,२५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १,५२,२३० विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले.
- मुलगे: ७६,७५३
- मुली: ७५,४७७
उत्तीर्ण विद्यार्थी:
- मुलगे: ६५,१६७ (८४.९०%)
- मुली: ६९,८२१ (९२.५०%)
मुलींनी मुलांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या चांगली कामगिरी केली आहे.
जिल्हानिहाय कामगिरी
नागपूर विभागात यंदा नागपूर जिल्हा प्रथम क्रमांकावर राहिला आहे.
- नागपूर – ९१.६६%
- गोंदिया – ८९.५९%
- चंद्रपूर – ८८.७२%
- वर्धा – ८७.५२%
- भंडारा – ८४.१२%
- गडचिरोली – ७९.६३%
उत्तीर्ण विद्यार्थ्यांची जिल्हानिहाय संख्या
- नागपूर – ५७,३४०
- चंद्रपूर – २३,७३९
- गोंदिया – १६,१८४
- भंडारा – १३,९२७
- वर्धा – १३,५८५
- गडचिरोली – ९,९३१
विभागातून एकूण १,३४,९८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
नागपूर विभागाने राज्यात आपले स्थान कायम राखले असले तरी एकूण निकालात किंचित घसरण दिसून येते. मात्र, मुलींची सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी हा यंदाच्या निकालाचा ठळक मुद्दा ठरला आहे.









Users Today : 27
Users Yesterday : 44
Views Today : 31
Who's Online : 0