कारंजा घाडगे येथे महात्मा फुले द्विशताब्दी जयंती महोत्सवाचा शुभारंभ

का टा वृत्तसेवा I परमानंद मुदगल

कारंजा घाडगे येथे महात्मा फुले द्विशताब्दी जयंती महोत्सवाचा शुभारंभ

कारंजा घाडगे,: दि. 14 एप्रिल — क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. येथील क्षत्रिय माळी समाज, कारंजा घाडगे यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात फुले यांची 199 वी जयंती साजरी करत महोत्सवाला प्रारंभ करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष प्रभाकर बनकर होते, तर उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. उमेश मेश्राम (नारायणराव काळे स्मृती मॉडेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय) उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.

यावेळी अवनी बनकर आणि अंशीता चरपे या चिमुकल्यांनी साकारलेली महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा विशेष आकर्षण ठरली.

डॉ. मेश्राम यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेत विविध उदाहरणांच्या माध्यमातून त्यांच्या विचारांचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच सेवानिवृत्त मुख्याध्यापक विलास वानखडे यांनी प्रास्ताविकात द्विशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली.

माजी ग्रामपंचायत सदस्य भीमराव कनेर आणि विनोद चाफले यांनीही महात्मा फुले यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाला स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सचिव अजय भोकरे, नगर पंचायत सदस्य योगिता कदम, व्यंकटराव चरपे, विजय मांडोकर, संगीता मांडोकर, बापूजी बनकर, अशोक नागले, करुणा गोडबोले यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता कळसकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन संजय कदम यांनी केले.

👉 द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

0
0

Leave a Reply

Realted News