मॉडेल स्पोर्टस् असोसिएशन, कारंजा येथील खेळाडू कु. प्रतीक्षा भांगे हिचा गौरव
का टा वृत्तसेवा I परमानंद मुदगल
कारंजा – मॉडेल स्पोर्टस् असोसिएशन, कारंजा येथील कु. प्रतीक्षा भगवानजी भांगे (सध्या वनरक्षक, वनविभाग बोरधरण, जिल्हा वर्धा) हिने अखिल भारतीय वन क्रीडा स्पर्धा (All India Forest Sports Meet) मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळविला आहे. ही स्पर्धा दिनांक 12 ते 16 नोव्हेंबर दरम्यान देहरादून (उत्तराखंड) येथे आयोजित करण्यात आली आहे.
कु. प्रतीक्षा ही महाराष्ट्र वन विभागाच्या व्हॉलीबॉल संघात निवडली गेली असून, तिच्या या यशाबद्दल मॉडेल स्पोर्टस् असोसिएशन, कारंजा तर्फे तिचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी असोसिएशनचे सचिव श्री. निलेश नरपाचे यांच्या वतीने शूज व कीट देऊन, प्रशिक्षक श्री. राजूभाऊ जसुतकर यांच्या हस्ते प्रतीक्षाचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला असोसिएशनचे अध्यक्ष श्री. दिलीप जसुतकर, उपाध्यक्ष श्री. गजानन भिलकर, सचिव श्री. निलेश नरपाचे, सहसचिव श्री. मनीष चेर तसेच सर्व पदाधिकारी व खेळाडू उपस्थित होते. सर्वांनी कु. प्रतीक्षाचे मनःपूर्वक अभिनंदन करून तिला आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.











Users Today : 0
Users Yesterday : 11