कारंज्यातील सनशाईन स्कूलच्या विद्यार्थिनीचे विज्ञान स्पर्धेत उज्वल यश

कारंज्यातील सनशाईन स्कूलच्या विद्यार्थिनीचे विज्ञान स्पर्धेत उज्वल यश

कारंजा : येथील सनशाईन स्कूलच्या विद्यार्थिनी कु. हर्षिका हेमराज बन्नगरे हिने विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचे व परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे.

                         ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर्स’ असोसिएशन यांच्या वतीने आयोजित सायन्स टॅलेंट सर्च स्पर्धा 2025-26 अंतर्गत घेण्यात आलेल्या ‘डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा’मध्ये हर्षिकाने यशस्वीरित्या उत्तीर्ण होत मानाचा पासिंग सर्टिफिकेट प्राप्त केला आहे.

                         सध्या इयत्ता ९ वी (इंग्रजी माध्यम) मध्ये शिक्षण घेत असलेल्या हर्षिकाने विदर्भ विभागातून या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. तिच्या या यशामुळे सनशाईन स्कूलसह संपूर्ण कारंजा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

                          हर्षिकाच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक तथा संस्थाध्यक्ष प्रेम महिले, सचिव विजयजी ठाकरे, पर्यवेक्षक पवन ठाकरे, शैक्षणिक प्रमुख हेमंत बन्नगरे, जेष्ठ शिक्षिका तथा वर्गशिक्षिका संगीता चाफले यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

0
0

Leave a Reply

Realted News