तृणमूलच्या कार्यालयात कॅरम खेळणाऱ्या तीन जवानांवर निलंबनाची कारवाई
कोलकाता: पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील सुरी येथे तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात कॅरम खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या (CAPF) तीन जवानांना निलंबित करण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाने या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित जवानांवर शिस्तभंगाची कारवाई केली असून, प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रविवारी दिली.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक जवान तृणमूलच्या कार्यालयात तीन स्थानिक तरुणांसोबत कॅरम खेळताना दिसत आहे. यावेळी दुसरा जवान त्याच्या शेजारी उभा असून तिसरा जवान खुर्चीवर बसलेला असल्याचेही दिसून येते.
या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते, अशी शक्यता लक्षात घेऊन आयोगाने तातडीने कारवाई करत संबंधित तिन्ही जवानांना निलंबित केले आहे. पुढील चौकशीनंतर अधिक कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.










Users Today : 27
Users Yesterday : 44
Views Today : 31
Who's Online : 0