डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात निदर्शने

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात निदर्शने

वृत्तसंस्था, सेंट पॉल (मिनिसोटा) : इराणमधील युद्ध आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात श्नो किंग्जश् रॅलींच्या माध्यमातून मोठ्या संख्येने निदर्शने करण्यात आली. यामध्ये मिनिसोटा हे राज्य आघाडीवर होते. या ठिकाणी ट्रम्प यांच्या स्थलांतरणाविषयीच्या आक्रमक धोरणाविरोधात नागरिक एकत्र आले होते.

सेंट पॉल येथील कॅपिटल लॉनवर झालेल्या कार्यक्रमात ब्रूस स्प्रिंगस्टीन यांचे भाषण हे प्रमुख आकर्षण होते. त्यांनी आणि इतर वक्त्यांनी कस्टम्स अँड इमिग्रेशन एन्फोर्समेंटच्या (आयसीई) एजंटना विरोध करण्यासाठी हिवाळ्यात रस्त्यांवर उतरलेल्या राज्यातील लोकांचे कौतुक केले. रेनी गुड आणि अॅलेक्स प्रेट्टी यांच्यावर फेडरल एजंटनी केलेल्या प्राणघातक गोळीबाराला प्रतिक्रिया म्हणून लिहिलेले श्स्ट्रीट्स ऑफ मिनियापोलिसश् हे गाणे स्प्रिंगस्टीन यांनी सादर केले.

या वेळी स्प्रिंगस्टीन यांनी गुड आणि प्रेट्टी यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. आयसीईविरुद्ध मिनिसोटा राज्यात झालेल्या प्रतिकारामुळे उर्वरित देशात आशेचा किरण निर्माण झाला आहे, असेही स्प्रिंगस्टीन म्हणाले. श्तुमच्या सामर्थ्याने आणि वचनबद्धतेने ही अजूनही अमेरिकाच आहे हे सिद्ध झाले आहे,श् असा विश्वास स्प्रिंगस्टीन यांनी व्यक्त केला.

इस्रायलमध्येही निषेध

तेल अवीव आणि इस्रायलमधील इतर काही शहरांमध्ये शेकडो नागरिक पश्चिम आशियातील युद्धाच्या निषेधार्थ शनिवारी रस्त्यावर उतरले. अनधिकृत निदर्शने करणार्या आंदोलकांना सुरक्षा दलांनी पांगवण्याचा प्रयत्न केला. अनेक माजी संसद सदस्य आणि प्रमुख डाव्या विचारसरणीच्या संघटनांनी शनिवारच्या मोर्चात सहभाग घेतला. अशा निदर्शनांमध्ये सहभागी होणार्यांची संख्या वाढत आहे.

 

0
0

Leave a Reply

Realted News