‘कॉकरोच जनता पार्टी’ सोशल मीडियावर ट्रेंड

‘कॉकरोच जनता पार्टी’ सोशल मीडियावर ट्रेंड

उपहासातून बेरोजगारीच्या प्रश्नांवर चर्चा

छत्रपती संभाजीनगरच्या तरुणाचा उपक्रम देशभरात व्हायरल; लाखो तरुणांचा प्रतिसाद

मुंबई/छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून ‘कॉकरोच जनता पार्टी’ हा उपहासात्मक ट्रेंड मोठ्या प्रमाणात चर्चेत आला असून, बेरोजगारी आणि तरुणांच्या प्रश्नांवर लक्ष वेधणाऱ्या या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. ‘बेरोजगार आणि आळशी लोकांचा आवाज’ अशी स्वतःची ओळख देणाऱ्या या उपक्रमाने अल्पावधीतच लाखो तरुणांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या मोहिमेमागे छत्रपती संभाजीनगर येथील ३० वर्षीय अभिजीत दीपके असल्याचे सांगितले जात आहे. पत्रकारिता आणि जनसंपर्क क्षेत्रातील शिक्षण घेतलेल्या अभिजीतने यापूर्वी विविध राजकीय संवाद मोहिमांमध्ये काम केले आहे.

माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयातील एका तोंडी टिप्पणीवरून सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर ‘जर सर्व झुरळे एकत्र आली तर काय होईल?’ या उपहासात्मक संकल्पनेतून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. सदस्यत्वासाठी ठेवण्यात आलेले विनोदी निकष आणि मीम-आधारित प्रचारामुळे तरुणांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.

दरम्यान, काही राजकीय नेत्यांनीही या मोहिमेची दखल घेतली असून, ही मोहीम आता केवळ विनोदापुरती मर्यादित न राहता बेरोजगारी, पेपरफुटी आणि तरुणांमधील वाढत्या असंतोषावर चर्चेचे व्यासपीठ ठरत असल्याची चर्चा सुरू आहे.

0
0

Leave a Reply

Realted News