“छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान – टप्पा १”

राज्यभर “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान – टप्पा १” राबविण्याचा शासन निर्णय

काटा वृत्तसेवा I प्रतीनिधी

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे त्वरित निराकरण करण्यासाठी राज्य शासनाने “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान – टप्पा १” राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार हे अभियान मार्च ते मे २०२६ या कालावधीत मंडळ स्तरावर तसेच नगर परिषद व नगर पंचायत स्तरावर आयोजित करण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शि…

या अभियानाचा उद्देश महसूल सेवा अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व कार्यक्षम करणे तसेच नागरिकांना Single Day Service Delivery पद्धतीने सेवा उपलब्ध करून देणे हा आहे.

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शि…

शिबिरांचे वेळापत्रक

राज्यातील मंडळ स्तरावर व नगर परिषद / नगर पंचायत स्तरावर एकदिवसीय समाधान शिबिरे पुढीलप्रमाणे आयोजित केली जाणार आहेत –

  • ७ मार्च व १४ मार्च २०२६ – मंडळ स्तरावर शिबिरे

  • १० एप्रिल व १७ एप्रिल २०२६ – मंडळ स्तरावरील दुसरा टप्पा

  • ८ मे व १५ मे २०२६ – नगर परिषद व नगर पंचायत स्तरावर शिबिरे

    छत्रपती शिवाजी महाराज समाधान

शिबिरांमध्ये मिळणाऱ्या प्रमुख सेवा

समाधान शिबिरांमध्ये नागरिकांना विविध महसूल सेवा एका ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामध्ये मुख्यतः –

  • प्रलंबित तक्रारींचे त्वरित निराकरण

  • ७/१२ उताऱ्यातील दुरुस्ती व डिजिटल ७/१२ उपलब्धता

  • उत्पन्न, निवासी, जात, नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्रांचे वितरण

  • जमीन अभिलेख अद्ययावत करणे

  • अकृषक रूपांतरणाबाबत मार्गदर्शन

  • ई-मोजणी, अॅग्रीस्टॅक, पीएम किसान योजनेसंबंधी सेवा

  • तक्रार निवारण व अन्य महसूल सेवा

    छत्रपती शिवाजी महाराज समाधान शि…

डिजिटल सेवांवर भर

महाभूमी पोर्टलवरून QR कोडयुक्त डिजिटल ७/१२ उताऱ्याला कायदेशीर वैधता देण्यात आली असून नागरिकांना ते थेट डाउनलोड करून वापरण्याबाबत मार्गदर्शनही या शिबिरांमध्ये दिले जाणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शि…

प्रशासनाची जबाबदारी

या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच इतर महसूल अधिकारी यांना विशेष जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. जिल्हा स्तरावर समित्या स्थापन करून शिबिरांचे नियोजन, अंमलबजावणी व अहवाल सादर करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शि…

राज्यातील नागरिकांनी या समाधान शिबिरांचा लाभ घेऊन महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन शासनाने केले आहे.

0
0

Leave a Reply

Realted News