धापेवाडा परिसरात वीज पडून मायलेकासह तीघांचा दुर्दैवी अंत
का टा वृत्तसेवा I संजय श्रीखंडे
धापेवाडा : आज 27 ऑगस्टला दुपारी 3.15 वाजता, येथून 3 कि. मी. निलगांव रोडवर शेतामध्ये काम करत असलेल्या दोन महिलांसहित एका तरूणाचा अंगावर वीज पडल्याने तिघांचाही घटनास्थळावरंच दुर्दैवी मृत्यू झाला. मृतात वंदू प्रकाश पाटील (42), त्यांच्या मुलगा ओम प्रकाश पाटील (18) आणि निर्मला रामचंद्र पराते (60) यांचा समावेश आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून पाटील कुटुंबातील मायलेकांच्या मृत्यूने कुटूंबात आता फक्त एकटी 16 वर्षाची मुलगीच असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे,
प्राप्त माहितीनुसार मृतक ओम प्रकाश पाटील हा घटनेच्या काही वेळापुर्वीच आपल्या मित्रासांठी गणेशमुर्ती घेवून धापेवाडा योथे आला होता. गणेशमुर्ती मुर्ती ठेवून पाउस सुरू झाल्याने तो शेतात काम करत असलेल्या आईला आणण्यासाठी येथुन 3 कि. मी. वर असलेल्या आपले शेतात गेला असता, सदर घटना घडली. घटनेची सुचना प्राप्त झाल्यावरून सामाजिक कार्यकर्ते मंगेश गमे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेउन, रुग्णवाहिका उपलब्ध करून मृतदेह सावनेर येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना केले. परिसरातील लोक या दुर्दैवी घटनेने अत्यंत भावनिक झाले आहे. सदर घटना सावनेर पोलीस हद्यीतली आहे.
१५ वर्षीय मुलगी झाली पोरकी
या घटनेमुळे पाटील कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. दोन वर्षांपूर्वी वंदना पाटील यांच्या पतीचे निधन झाले होते. त्यानंतर वंदना आणि मुलगा ओम शेतीत राबून घर चालवित होते. १५ वर्षांची मुलगी पिहू हिचे शिक्षण सुरू आहे. मात्र, या दुर्दैवी घटनेने आई आणि मुलगा दोघेही गेल्याने पिहू पोरकी झाली आहे.
घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी सागर खर्डे, कळमेश्वर तहसीलदार विकास बिक्कड, पोलिस निरीक्षक उमेश पाटील, उपनिरीक्षक स्वप्निल गेडाम, धापेवाडा तलाठी नितेश मोहीतकर, कोतवाल मंगेश पारसे व पोलिस अधिकारी आणि गावकरी घटनास्थळी पोहचले. तसेच हितज्योती फाउंडेशन चे हितेश बनसोड आणि मंगेश गमे यांची टीम घटनास्थळी पोहचून त्यांनी मृतकांना सावनेर रुग्णालय येथे नेण्यासाठी मदत केल्याची माहीती आहे.. शासनाने मृतकांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. शेतकरी व नागरिकांना पावसाळ्यात वीजेच्या धोक्यांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन तहसीलदार विकास बिक्कड यांनी केले आहे