नागपूरात संत सेनाजी व संत नगाजी महाराजांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा २७ मार्चला

नागपूरात संत सेनाजी व संत नगाजी महाराजांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा २७ मार्चला

काटा वृत्तसेवा/ भूषण सवाईकर

नागपूर :  महाराष्ट्र नाभिक महामंडळ, नागपूर जिल्हा आणि संत नगाजी महाराज मठ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत सेनाजी महाराज व संत नगाजी महाराज यांच्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा शुक्रवार, दि. २७ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून दारोडकर चौक येथील संत नगाजी महाराज मठात भक्तीमय वातावरणात संपन्न होणार आहे.

या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नागपूर महानगरपालिकेच्या महापौर निता ठाकरे, तसेच आमदार कृष्णा खोपडे (पूर्व नागपूर), मोहन मते (दक्षिण नागपूर), प्रविण दटके (मध्य नागपूर), विकास ठाकरे (पश्चिम नागपूर), संदीप जोशी (विधान परिषद) आणि अभिजीत वंजारी (विधान परिषद) उपस्थित राहणार आहेत.

तसेच विशेष उपस्थितीमध्ये नगरसेवक सुधीर (बंडुभाऊ) राऊत, श्रीकांत आगलावे, सचिन नाईक, हेमंत बरडे, कल्पक भनारकर, तुषार लारोकर, नगरसेविका सरिता नांदुरकर, वैशाली उदापूरकर, उमा देशमुख यांच्यासह महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक प्रभाकर फुलबांधे, अंबादास पाटील, पुरुषोत्तम मिरासे आणि गजानन येस्कर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता मूर्ती प्राणप्रतिष्ठा व पूजाविधीने होईल. दुपारी २ वाजता भजन, त्यानंतर दुपारी ३.३० वाजता गोपालकाला आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या पवित्र सोहळ्याला नाभिक समाज बांधवांनी सहकुटुंब उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

0
0

Leave a Reply

Realted News