मानवधर्माचे संस्थापक बाबा जुमदेवजी यांची जयंती उत्साहात साजरी

का टा वृत्तसेवा | भूषण सवाईकर

मानवधर्माचे संस्थापक बाबा जुमदेवजी यांची जयंती उत्साहात साजरी

मोहपा : मोहपा शहरात मानवधर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. या शोभायात्रेला मोहपा व परिसरातील विविध गावांमधून मोठ्या संख्येने भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

ढोल-ताशा, डीजे आणि आतिषबाजीने रंगली शोभायात्रा

सावनेर, ईसापुर, दहेगाव, केळवद, झिंगाबाई टाकळी, पारडसिंगा (म.प्र.), उबाळी, द्योराड, खैरी, पारडी देशमुख, कोहळी, सवंद्री, लोहगड, म्हसेपठार, खुमारी, नागपूर, बोरगाव (धुरखेडा), भडांगी, वाढोणा, सावळी, पिल्कापार, कळमेश्वर, डोरली भिंगारे आदी गावांतील सेवकांनी ढोल-ताशा पथक, डीजे आणि फटाक्यांच्या आतिषबाजीसह शोभायात्रेत सहभाग घेतला. त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला.

गांधी चौकातून शोभायात्रेला सुरुवात

गांधी चौक येथील दीपक कामडी यांच्या निवासस्थानापासून शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला. सावनेर शाखेचे मार्गदर्शक राजेंद्र चवरे यांच्या हस्ते भगवान हनुमानजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

तसेच बोरगाव (धुरखेडा) येथील मार्गदर्शक दिनेश टेकाडे व कैलास सहारे यांच्या हस्ते बाबा जुमदेवजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आई वाराणसी यांच्या प्रतिमेचे पूजन सावनेर येथील मार्गदर्शिका गीता चवरे तसेच मोहपा येथील हेमलता रेवतकर, वर्षा कामडी आणि जयश्री कामडी यांच्या हस्ते करण्यात आले.

मान्यवरांच्या हस्ते शोभायात्रेचे उद्घाटन

शोभायात्रेचे उद्घाटन मोहपा शाखेचे मार्गदर्शक प्रमोद रेवतकर, राजेंद्र चवरे, मुकेश सूर्यवंशी (दहेगाव), राधेश्याम चव्हाण (ईसापुर), शुभम कोहळे, दिनेश टेकाडे (बोरगाव), सचिन पाटील (डागा पिपळा), कैलास सहारे (सावनेर) आणि लिलाधर पाल (कळमेश्वर) यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रमोद रेवतकर यांनी केले.

मोठ्या संख्येने भाविकांचा सहभाग

या शोभायात्रेत प्रदीप कामडी, गुरुदेव काथवटे, दीपक कामडी, किशोर येणुरकर, अरविंद पलाटे, जीवन गवळी, विलास कावडकर, चंद्रशेखर कावडकर, अमोल कामडी, शुभम वडे, अमोल रेवतकर, अभय रेवतकर, दिलीप लोणकर, विनोद हिवराळे, रवी लोखंडे, विकी खोब्रागडे, मनोज टुले, रोशन टुले, मुरारी मडावी, गुलाब निमकर, शरद कावडकर, विनोद चचाने, राजू बेलखडे, अभिजीत जांभुळकर, चंदू वंजारी, विजय मेश्राम, जगन सोनवणे, राजू नेहारे, युवराज कौरती, वासुदेव सलाम, विजय भद्रे, देवा मेश्राम, ईश्वर नंदनवार, आकाश मोरे, सुरेश वाघमारे, आनंद मांडवकर, रोशन चवरे यांच्यासह परिसरातील अनेक सेवक आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

मोहपा शहरात भक्तीमय वातावरण

या भव्य शोभायात्रेमुळे संपूर्ण मोहपा शहरात भक्तीभाव आणि नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले. बाबा जुमदेवजी यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सेवकांनी एकत्र येत ही प्रेरणादायी परंपरा जपल्याचे चित्र पाहायला मिळाले.

0
0

Leave a Reply

Realted News